'सबका साथ, सबका विकास'चा नारा देऊन मोदींनी सर्वांचं भलं केलं : शहा

Narendra Modi Amit Shah
Narendra Modi Amit Shahesakal
Updated on
Summary

'मोदींनी गरीबाच्या घरात जन्म घेतलाय, त्यांना गरीबांच्या वेदना माहीत आहेत.'

UP Assembly Election : मोदीजी (PM Narendra Modi) 2014 मध्ये म्हणाले होते, भाजप सरकार गरीब, दुर्बल, दलितांचं सरकार आहे. 60 वर्षांपासून गरीबांच्या घरात गॅस सिलिंडर आली होती का? असा सवाल करत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Assembly Election) 1.76 लाख घरांना गॅस कनेक्शन देण्याचं काम भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारनं केलंय. पंतप्रधान मोदी यांनी गरीबांच्या घरात जन्म घेतलाय, त्यांना गरीबांच्या वेदना माहीत आहेत, असं शहांनी स्पष्ट केलं. ते करहल येथील जनतेला संबोधित करताना बोलत होते.

अमित शहा पुढे म्हणाले, मोदींनी देशात प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली. आज मोदी सरकार (Modi Government) देशातील गरीबांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा खर्च देत आहे. मी करहलच्या जनतेला विचारू इच्छितो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली 300 हून अधिक जागांसह भाजपचं सरकार (BJP Government) स्थापन व्हावं, अशी तुमची इच्छा आहे की नाही? यासाठी 300 जागांचं काम एका जागेवरून करता येईल, यासाठी मला तुमची मदत हवीय. त्यामुळं करहलमध्ये कमळ फुलवा आणि भाजपला पुन्हा संधी द्या, असं आवाहन त्यांनी करहलमधील जनतेला केलं.

Narendra Modi Amit Shah
'माझ्या कुटुंबानं पक्षासाठी रक्त सांडलंय, मी कदापि काँग्रेस सोडणार नाही'

मी टीव्हीवर पाहिलंय, अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी फॉर्म भरल्यानंतर 10 मार्चला सपाची ताकद दाखवू, असं जाहीर केलंय. मात्र, अखिलेशना कुठं माहितीय? उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार आहे. सपा सरकारमध्ये अखिलेश यांच्या कुटुंबातील 45 लोकांना वेगवेगळी पदं मिळाली आहेत. हे लोक फक्त कुटुंबाचा विचार करतात, स्वतःच्या लोकांचा विचार करतात. असले लोक समाजाचं भलं करत नाहीत. मोदी सरकारनं सबका साथ, सबका विकासाचा नारा देऊन सर्वांचं भलं केलंय, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.