Political News : काँग्रेस उमेदवारावर 'भिकारी' होण्याची वेळ

Congress candidate Dhanilal Shah
Congress candidate Dhanilal Shahesakal
Updated on
Summary

उमेदवाराच्या या अजब मागणीची संपूर्ण राज्यात चर्चा सुरुय.

Uttarakhand Assembly Election 2022 : पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसं मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पुढारी पुढं सरकू लागले आहेत. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल (Tehri Garhwal) जिल्ह्यात एक ताजी घटना समोर आलीय. इथं काँग्रेसचा एक उमेदवार (Congress Candidate) भिकारी (Beggar) समजून मतदान करा, असं आवाहन मतदारांना करतोय. उमेदवाराच्या या अजब मागणीची संपूर्ण राज्यात चर्चा सुरुय.

Congress candidate Dhanilal Shah
Goa Election : 'मी हरलो तर राजकारण सोडेन, पण जिंकलो तर..'

टिहरी गढवालच्या घनसाली विधानसभा मतदारसंघातून (Ghatsila Assembly Constituency) नशीब आजमावत असलेले काँग्रेसचे उमेदवार धनीलाल शाह (Congress candidate Dhanilal Shah) स्वत:च्या मतदारसंघातही अशाच प्रकारे मतं मागत आहेत. भीक म्हणून मते मागणारे धनीलाल मतदारांना इतरही अनेक गोष्टी सांगत आहेत. ते घरोघरी जाऊन लोकांना सांगत आहेत की, 'मला तुमच्याकडून पूर्ण आशा आहे. यावेळी तुम्ही मला नक्कीच विधानसभेत पाठवाल आणि राज्याचा विकास करण्याची संधी द्याल.'

उत्तराखंडमध्ये निवडणूक कधी होणार?

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या (Uttarakhand Assembly Election) 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

Congress candidate Dhanilal Shah
'काही झालं तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत राहुल गांधींसोबत राहणार'

काय आहे राज्यातलं निवडणूक समीकरण?

70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपत आहे. इथं काँग्रेससह भाजप, आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party), बसपा (BSP) आणि अनेक छोटे पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत. मात्र, उत्तराखंडची निवडणूक भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक राहिलीय. कारण, दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. उत्तराखंडमधील सत्ता परिवर्तनाचं मिथक मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उत्तराखंडमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 57 जागा जिंकून प्रचंड बहुमतानं आपले सरकार स्थापन केलं, तर विरोधी काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. त्यानंतर त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) मुख्यमंत्री झाले. मात्र, 4 वर्षांनी त्यांना हटवून भाजपनं सत्तेची कमान तीरथसिंह रावत यांच्याकडं सोपवली. परंतु, काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री (Uttarakhand CM) बनवण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.