UP Assembly Election: सर्वांत श्रीमंत उमेदवाराची संपत्ती १४८ कोटी

उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वांत श्रीमंत उमेदवाराकडे १४८ कोटींची संपत्ती आहे.
UP Assembly Election
UP Assembly ElectionSakal
Updated on

नोएडा : उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वांत श्रीमंत उमेदवाराकडे १४८ कोटींची संपत्ती आहे. तर दोन उमेदवारांनी आपल्याकडे काहीच संपत्ती नसल्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती निवडणूक सुधारणांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने अहवालाद्वारे दिली. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून हा अहवाल जारी करण्यात आला. आणखी दोन उमेदवारांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची तर एकाने दहा हजार रुपयांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. (Uttarpradesh Assembly Election Updates)

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सहभागी उमेदवारांची सरासरी संपत्ती ३.७२ कोटी रुपये आहे. येत्या १० तारखेला पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात विविध पक्ष आणि अपक्षांसह ६०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मथुरा कॅन्टोमेंट मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे अमित अग्रवाल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती १४८ कोटी रुपये आहे.

UP Assembly Election
सुनील डिवरे हत्या प्रकरण: चारही मारेकऱ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

त्यानंतर, मथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या बसपच्या एस.के. शर्मा यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ११२ कोटी रुपये आहे. समाजवादी पक्षाचे सिकंदराबादचे उमेदवार राहुल यादव यांनी १०० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार कैलास कुमार आणि राष्ट्रीय निर्माण पक्षाचे उमेदवार के.एम.प्रिती यांनी आपल्याकडे काहीच संपत्ती नसल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, एतमादपूरमधील अपक्ष उमेदवार शिवचरण लाल व आंबेडकरी हसनुराम यांनी आपल्याकडे केवळ एक हजार रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.