धोका वाढला, एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह; एक वर्षीय चिमुकलाही सुटला नाही...

चौदामैल : रुग्णांची संख्या 12 होताच सील करण्यात आलेला परिसर.
चौदामैल : रुग्णांची संख्या 12 होताच सील करण्यात आलेला परिसर.
Updated on

बाजारगाव (जि.नागपूर) :  संत्रानगरीचे प्रवेशद्वार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील चौदामैल (व्याहाड) येथील रुग्णांची संख्या आता तेथील रुग्णसंख्या एकूण बारा झाली आहे. प्रशासनाने हा परिसर सील केला असून येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, "रेड झोन' घोषित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील हा परिसर कोरोनाचा "हॉटस्पॉट' ठरला आहे.

54 जणांना क्‍वारंटाईन
येथील 54 वर्षीय महिलेची प्रकृती खराब झाली असता तिला प्रथम खासगी रुग्णालयात व महिलेची
लक्षणे बघता नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या महिलेचे स्वॅप घेऊन कोरोना चाचणीकरिता पाठविण्यात आले. 5 जूनला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळमेश्वर येथील आरोग्य विभागाची चमू घटनास्थळी पोहोचून त्या परिसराची पाहणी केली व परिवारातील 54 लोकांना क्‍वारंटाइनसाठी पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी 6 जूनला मुलगा व सुनेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणखी 21 लोकांना नागपूर येथे क्‍वारंटाइनसाठी पाठविण्यात आले. आज रविवारी त्याच परिवारातील लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली. यात एक वर्षाच्या चिमुकल्याला कोरोना झाला. या परिवाराचे चौदामैल येथे मोबाईलचे दुकान होते व त्या दुकानात येणाऱ्या सर्व ग्राहकांचा आरोग्य विभाग तपास घेत असून, सर्वांना तपासणीसाठी नागपूर येथे पाठवणार असल्याची माहिती कळमेश्वर येथील ठाणेदार मुळूक व तालुका आरोग्य अधिकारी दीपाली कुलकर्णी यांनी दिली.

आरोग्य विभागाची चमू सज्ज
संपूर्ण परिसर सील करून "रेड झोन' घोषित करण्यात आले. सर्व परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाची चमू परिसरात सज्ज आहे. सर्वांची घरोघरी जाऊन विचारपूस करणे सुरू आहे.
-डॉ. दीपाली कुलकर्णी
तालुका आरोग्य अधिकारी, कळमेश्वर

नागरिकांना मदत करण्यात येईल
परिसर सील करून कुणालाही आतमध्ये व बाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच सर्व पोलिस सतर्क असून परिसरात असणाऱ्या लोकांना वेळोवेळी मदत करीत आहेत.
-मारोती मुळूक
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.