नागपूर ः नवोदय बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड याच्या बँकेतील ३८ कोटी ७५ लाखांच्या घोटाळ्यातील १६ आरोपी अद्यापही फरार आहे. या घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध एमपीआयडी न्यायालयाने स्टॅन्डिंग वारंट जारी केले आहेत.
सचिन रामदास मित्तल, प्रिती सचिन मित्तल (सिद्धीविनायक अपार्टमेंट, रामदासपेठ), मनिष किशनलाल गांधी (लाडीकर ले आऊट), विजय कैलास जोशी, मुकेश कैलास जोशी, राकेश कैलास जोशी, गोविंद सुरेश जोशी (सर्व रा. रामदेव अपार्टमेंट, मनिषनगर), प्रकाश शामसुंदर शर्मा (जुने राममंदिर, पारडी), वीरेंद्र गजानन आवळे (छत्रपतीनगर), लीना बालकिशन गांधी (लाडीकर ले आऊट), सचिन हिरालाल कश्यप (गृहलक्ष्मी हाईट्स, बेलतरोडी), पंकज हिरालाल कश्यप, शिरिष बाळासाहेब मंदाखलीकर (अश्वमेध अपार्टमेंट, रामदासपेठ) आणि राहुल पवनकुमा ओझा (किर्ती अपार्टमेंट, नंदनवन मेन रोड) अशी या आरोपींची नावे आहेत.
२०१० ते २०१५ या कालावधीत बँकेचे बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष अशोक धवड व त्यांचे इतर संचालकांनी बँकेत गैरव्यवहार केला. कर्ज मागणाऱ्या कर्जदारांची कर्ज फेडण्याची क्षमता आहे की नाही याची खात्री न करता त्यांना कर्ज दिले. कर्ज देताना ज्यांची मालमत्ता तारण ठेवली अशांचे कर्ज बाकी असताना देखील त्यांचे तारण परत करण्यात आले. काही प्रकरणात कर्जदारांच्या वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून त्यांनाही कर्ज दिले. कर्जदारांकडे कर्ज असतानाही त्यांना कर्ज नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले. वाहन कर्ज देताना तारणपोटी मूळ कागदपत्रे ताब्यात घेतले नाहीत.
अध्यक्ष अशोक धवड व इतर संचालकांनी मोठमोठ्या रकमा अग्रिम म्हणून उचल केल्या. कर्जदारांना बनावट कर्ज दिल्याचे दाखविले. बँकेचे सदस्य नसलेल्यांना देखील कर्ज देण्यात आले. संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय कर्ज देण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १५ डिसेंबर २०१६ रोजी नवोदय बँकेवर आर्थिक निर्बंध लावले असताना देखील बँकेच्या संगणकात फेरफार करून पूर्वीच्या नोंदी करून बँकेत ३८ कोटी ७५ लाखाचा घोटाळा करण्यात आला.
बँकेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास येताच भंडारा येथील सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्रीकांत सुपे यांनी जानेवारी आणि जुलै २०१७ मध्ये लेखापरिक्षण केले. त्यात हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी २०१९ साली धंतोली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. आतापर्यंत धवड यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले. मात्र, या प्रकरणातील १६ आरोपी अजुनही फरार आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात स्टॅन्डिंग वारंट जारी केले आहे. या आरोपींची माहिती देण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.