बापरे! मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शाळा बंद

16 student including headmaster found corona positive in patansaongi of nagpur
16 student including headmaster found corona positive in patansaongi of nagpur
Updated on

पाटणसांवगी (नागपूर) :  पाटणसांवगी येथील आदर्श विद्यालयात मुख्याध्यापिकेसह १३ ते १४ वयोगटातील १६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या चाचणीत समोर आले. याव्यतिरिक्त अन्य सात जणही कोरोनाबाधित आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शाळा विद्यार्थ्यांसाठी १० दिवसापर्यंत बंद करण्यात आली आहे. 

कोरोनाचा जोर कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. ग्रामीण व शहरी भागात शाळा सुरू झाल्या आहेत. पालक वर्ग चिंतेत तर विद्यार्थी उत्साहात शाळेत जात आहेत. मात्र, पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. नागपूर जिल्ह्यासह विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पंधरवड्यापूर्वी दोनशे ते अडीचशेपर्यंत असलेला कोरोनाबाधितांचा आलेख या आठवड्यात दररोज पाचशेने वाढत असून, प्रशासनात धडकी भरली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज ७५४ नवे बाधित आढळून आल्याने महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, बळींच्या संख्येतही आज वाढ झाली. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून आणखी कडक पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे.

कोरोनामुक्तांचा दर घसरला - 
शुक्रवारी २३४ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १ लाख ३१ हजार ९४ जण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचा दर ९३.०३ टक्के आहे. पंधरा दिवसांपूर्वी ५ फेब्रुवारीला कोरोनामुक्तांचा दर ९४.५४ होता. आज मात्र यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.