नागपूर: कोरोनाचा विषाणूचा हैदोस नागपुरात सुरू झाला आहे. समुदाय प्रादुर्भाव झाला असल्यानेच दर दिवशी कोरोनाबाधितांचा नवीन काळा रेकार्ड तयार होत आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी नागपुरात १२४५ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे.
मेयो-मेडिकलसह खासगी रुग्णालयात सुमारे ३९ जणआंचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूमुळे दगावलेल्यांची संख्या ४८८ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यू पाचशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. तर बाधितांची संख्या १३ हजार ९९० वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या विषाणूचा निर्दयी खेळाने मेयो रुग्णालयात दोन दिवंसात मेडिकल-मेडिकलमध्ये ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले आहे. ऑगस्ट महिन्यात १६ दिवसात ३३९ मृत्यूंची नोंद झाली.
नागपूरात ३० जूनपर्यंत कोरोना नियंत्रणात होता. अवघे १५०३ कोरोनाबाधित होते. मात्र पुढील पंचेचाळीस दिवसांमध्ये नागपूर कोरोनाचे हॉस्टस्पाट बनले असून १४ हजारांपर्यंत कोरोनाचा आकडा फुगला आहे. १५ ऑगस्ट रोजी नागपुरात ७३३ तर १६ऑगस्ट रोजी ५१२ बाधितांची भर पडली. कोरोनाची बाधेने दगावलेल्या रुग्णांना प्रामुख्याने फफ्फुसाचा संसर्ग झाल्याने श्वसननाचा त्रास झाला. याशिवाय विविध व्याधी असल्याने अनेक अवयव निकामा होत गेल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली.
मेयोतील मृतकांमध्ये महेंद्रनगर येथील ३० वर्षीय महिला, तसेच लकडगंज येथील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यूचा समावेश आहे. तर नारा रोड येथील १०० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाच्या बाधेने झाला. नाईक तलाव बांगला देश येथील ८० वर्षाचा वृद्ग देखील कोरोनाच्याबाधेने दगावला.
मेडिकलमध्ये जरिपटका येथील ५१ वर्षीय महिलेसह २० जणांचा मृत्यू झाला. यात आयुध निर्माणी, अंबाझरी येथील ५७ वर्षीय व्यक्ती, चंद्रपूर (मारगाव) येथील ५२ तर नागपूरच्या एकता कॉलनीतील ७५ वर्षीय व्यक्ती दगावला. याशिवाय अमरावती येथील मिरर स्ट्रिट येथील ६१ वर्षीय व्यक्ती, भंडारा रोड येथील २१ वर्षीय युवक, शिवाजीनगर येथील ७९ वर्षाचा व्यक्ती कोरोनामुळे मगावला आहे. गोधनी येथील ४२ वर्षीय, क्वेट्टा कॉलनी येथील ४७ व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. रामेश्वरी येथील ४३ वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला.
नागपुरातील नारा रोड येथील आराधना कॉलनी येथील १०० वर्षीय व्यक्ती ठणठणीत होते. मात्र कोणाच्यातरी संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झाली. त्यांना १३ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात (मेयो) आले. अवघ्या एका दिवसातच त्यांची प्रकृती खालावली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
ग्रामीण भागात ४ हजाराजवळ कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. यातील २२८० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर शहरातील १० हजार १७२ कोरोनाबाधिंतापैकी ५ हजार रुग्ण बरे झाले. असे एकूण ६ हजार ५३९ रुग्ण घरी पोहचले आहेत. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी नागपुराती ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर ४६ टक्के आहे. सद्या नागपूर जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरची संख्या 25 आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.