गुन्हेगारांनो खबरदार! लेडी सिंघमची एन्ट्री; वाहतूक विभागाच्या पहिल्या महिला अधिकारी

aashalata khapre appointed as traffic police officer in nagpur
aashalata khapre appointed as traffic police officer in nagpur
Updated on

नागपूर: शहर पोलिस वाहतूक विभागाच्या इतिहासात पोलिस आयुक्तांनी पहिल्यांदाच झोनचे प्रमुखपदावर एका महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आशालता खापरे असे नियुक्ती मिळालेल्या महिला पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांना सक्‍करदरा वाहतूक झोनची जबाबदारी देण्यात आली आहे.

आशालता खापरे या मूळच्या पुण्याच्या आहेत. गेल्या काही महिण्यांपुर्वीच त्यांची नागपूर शहर पोलिस दलात बदली झाली होती. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आशालता यांची नेमणूक वाहतूक शाखेत केली.

पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी आशालता यांच्यावर विश्‍वास टाकत अपघात सेलची जबाबदारी दिली. त्यांनी शहरात होणाऱ्या अपघात ठिकाणांचा अभ्यास केला. अपघात स्थळांची माहिती गोळा केली. अपघात ठिकाणांचा सर्व्हे करून ‘ब्लॅक स्पॉट’ निश्‍चीतीकरण केले. शहरातील अपघात कमी करण्यासाठी या सर्व्हेचा उपयोग करण्यात येत आहे. 

तसेच त्यांना कोर्ट सेलचीसुद्धा जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी कोर्टात सुरू असलेल्या केसेस आणि दंडात्मक कारवाईत सुधारणा करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. गेल्या १९ ऑगस्टला त्यांच्याकडे सक्करदरा झोनचा पदभार देण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांची बजाजनगर पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी आशालता खापरे यांची नियुक्त करण्यात आली.

"आशालता यांनी सण-उत्सवाचा बंदोबस्त, व्हिआयपी बंदोबस्ताची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. अपघाताच्या संख्येमध्ये घट आणि ई चालानामध्ये वाढ करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. वाहतूक विभागात पहिल्या महिला अधिकारी म्हणून नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे".
- विक्रम साळी 
(पोलिस उपायुक्त)

"सक्‍करदरा विभागातील वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्यावर भर देणार. तसेच अपघाताच्या संख्येत घट करणे आणि अवैध वाहतूक रोखण्याला प्राधान्य देण्यात येईल. लोकाभिमुख पोलिसींग करण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी दिलेली जबाबदारी आणि त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणार आहे.
- आशालता खापरे 
(नवनियुक्त पोलिस निरीक्षक, सक्करदरा झोन)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.