"पैसे दिले तरच काम होईल" अशी धमकी देणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याच्या एसीबीने आवळल्या मुसक्या; नागपुरात धडक कारवाई 

ACB arrested NMC worker while taking money from man in Nagpur
ACB arrested NMC worker while taking money from man in Nagpur
Updated on

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला विवाह नोंदणी करण्यासाठी साडेचार हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले. रामचंद्र बिंदा महतो (वय ४९) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मनपाच्या मंगळवारी झोनमध्ये कार्यरत आहे. 

तक्रारदार हे स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत असून गड्डीगोदाम येथे राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले. विवाहाची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक असल्याने त्यांनी मित्रांना विचारपूस केली होती. मित्राने मंगळवारी झोन कार्यालयातील विवाह नोंदणी कर्मचारी रामचंद्र महतो याच्याशी भेट घालून दिली. 

तक्रारदाराने महतो याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता आवश्यक कागदपत्रांची यादी, विवाह नोंदणी फॉर्म आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावी लागेल. तसेच विवाह नोंदणीच्या कामासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असेही सांगितले. पैसे दिले तरच मी काम करेल, असे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. 

पोलिस उपअधीक्षक नरेश पारवे यांनी गोपनीय चौकशी केली असता महतोने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी सदर येथील मनपा दवाखान्याबाहेर सापळा रचला. तडजोड केल्यानंतर महतोने साडेचार हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून महतोला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अपर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()