नागपूर: वर्षानुवर्षांचे नात्याचे ऋणानुबंध, परंतु अवघ्या सहा महिन्यात कोरोनाने जगण्या-मरण्याची पद्धत बदवलली. नात्यांमध्ये दरी निर्माण झाली. कोरोनाच्या मृत्यूनंतर हक्काच्या माणसांना अत्यसंस्कार करता येत नाही. अंत्यसंस्कारात सहभागी होता येत नाही. ना मृत्यूचे दुःख, ना घरासमोर वाहणारा अश्रूंचा महापूर दिसत...ना हंबरडा फोडता येत, ना प्रेताला खांदा देता येत. चिता रचल्यानंतर सरणाला अग्नीसुद्धा देता येत नाही, विद्युत दाहिनीवरच अंत्यंसंस्कार. आता कुठे चितेला अग्नि देण्याची परवानगी दिली, नात्याला डावलून तेही काम प्रशासन करते. मृत्यूनंतर अस्थींचे परंपरेनुसार विसर्जन व्हावे ही नातेवाईकांची इच्छा असते, परंतु वाहतूक बंद असल्याने अनेकांच्या अस्थी घाटावरील लॉकरमध्ये लॉकडाऊन आहेत.
कोरोनाने मृत झालेल्या परिवारातील जवळचे नातेवाईक कुठे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर तर मेयो, मेडिकल व इतर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपाकडून पार पाडली जाते. शहरात १० स्मशानभूमी (घाट) आहेत. प्रामुख्याने त्यापैकी गंगाबाई घाट, मोक्षधाम, अंबाझरी घाट, वैशालीनगर व इतर घाटांरही कोरोना मृतांवर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. ज्यांनी अस्थि नेल्या नाही, अशा मृतकाच्या अस्थी (हाडे) लॉकरमध्ये ठेवण्यात येतात.
नियमानुसार, एका कोरोनामृत व्यक्तीच्या अस्थी एका लॉकरमध्ये ठेवण्यात याव्यात. नातेवाईक अस्थि घेण्यास असमर्थ असल्याने त्या लॉकरमध्ये ठेवण्यात येतात. तर कोणाला परंपरेनुसार अस्थींचे विसर्जन करायचे असते, अस्थी घरी नेण्याएवजी घाटावरच ठेवतात. यामुळेही अस्थी घेण्यासाठी नातेवाईक घाटावर पोहचत नाही. घाटांवर कोरोनामृतकांच्या अस्थींची संख्या वाढत असल्याने एका लॉकरमध्ये ३ ते ४ मृतकांच्या अस्थी ठेवण्यात येत आहेत. मृत्यूचा वाढता आकडा बघता अंत्यसंस्कारानंतर ठेवण्यात येणाऱ्या अस्थिसांठी नागपूरच्या घाटावर लॉकरची संख्या कमी असल्याचे दक्षिण नागपुरातील एका घाटावर कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
कोरोना संसर्गामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे अनेक कुटुंबातील मृतकांच्या अस्थी शहरातील मोक्षधाम, गंगाबाई घाट, अंबाझरी घाट, गंगाबाई घाट या घाटांवर लॉकरमध्ये नातेवाईकांच्या मर्जीनुसार ठेवण्यात आल्या आहेत. अप्रत्यक्षरित्या घाटावरील कर्मचाऱ्यांवर अस्थींच्या सुरक्षेची जबाबदारी आली आहे. शहरातील घाटांवरील एकूण लॉकरची संख्या शंभरावर आहे.
दिवसेदिवस मृतांची संख्या वाढत असल्याने हे लॉकर अपूरे पडण्याची दाट शक्यता आहे. मोक्षधाममध्ये २४ तर अंबाझरीमध्ये ४८ लॉकर वगळता उर्वरित गंगाबाई घाट. मानेवाडा घाट, शांतीनगर घाट, मानकापूर घाट येथे प्रत्येकी १२ लॉकर आहेत. सहकारनगर, वाठोडा, दिघोरी घाटावर लॉकर सुविधा नाही.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.