बाबाऽऽ बाबा! असे स्वतःचे आयुष्य संपवू नका; फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न

Attempted suicide by making the artist live on Facebook nagpur crime news
Attempted suicide by making the artist live on Facebook nagpur crime news
Updated on

नागपूर : पूर्वीच कोरोना कहर. त्यात लॉकडाउनने त्रस्त झालेल्या शहरातील एका गायक कलावंताने फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ही बाब सोबतच्या कलावंतांना लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात भरती केले. त्यामुळे सुदैवाने प्राण वाचले. कलावंताने आत्महत्येचा प्रयत्न केलेली ही शहरातील एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे. त्यामुळे कला क्षेत्रात प्रचंड भीतीयुक्त वातावरण आहे.

यापूर्वी ५ मार्चला मानेवाडा येथील यश मदनकर यानेही जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीण मून (३०, रा. पारडी) असे या कलावंताचे नाव आहे. हाताची नस कापून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार त्याने फेसबुक लाइव्ह केला. दरम्यान, नेटिझन्स आणि शहरातील कलावंतांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याला सावरत असताना त्याची मुलगी आणि पत्नी दोघीही रडत होत्या.

फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाचा हा प्रकार इतर सहकारी कलावंतांनी बघताच, पारडी येथील त्याचे घर गाठले. तात्काळ त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नैराश्येतून प्रवीणने हे पाऊल उचलले. त्याच्या हाताची नस कापली गेली. शुक्रवारी शहरातील कलावंतांसोबत प्रवीण हा जिल्हाधिकारी, महापौर व पालकमंत्र्यांना कलावंतांच्या प्रश्नी भेटायला गेले होते.

त्यावेळी त्यांनी कलावंतांना मदतीची मागणी केली होती. कलाक्षेत्राला लॉकडाउनमधून मोकळीक देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांकडून कुठलीही मदत मिळाली नाही. उलट झिडकारली गेली. त्यामुळेच प्रवीण हा नैराश्येत गेल्याचे त्याचे सहकारी सांगताच. शनिवारी दुपारीही तो अतिशय नैराश्येत होता अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.