घाटांवरच ‘पीपीई किट’चा काळाबाजार; शोकाकूल नातेवाईकांकडून ५०० रुपये वसुली

Black market of PPE kits on crematorium 500 recovered from bereaved relatives
Black market of PPE kits on crematorium 500 recovered from bereaved relatives
Updated on

नागपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून आपले वडील, आई, भाऊ, बहीण, आजोबा अथवा अन्य जवळच्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी काळीज नसलेले आणि भावनाशून्य असलेले काही कर्मचारी पैसे वसूल करीत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. मृताचा चेहरा दाखविण्यासाठी भ्रष्टाचार करीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

शहरात दररोज ६० पेक्षा जास्त कोरोनाबळींची नोंद होत आहे. कोरोनाने मृत पावल्याने पार्थिव कुटुंबीयांकडे न देता महापालिकेचे कर्मचारीच घाटावर नेऊन अंत्यसंस्कार करतात. यावेळी केवळ कुटुंबीयांना माहिती दिली जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबातील एक-दोन सदस्य कर्मचाऱ्याने सांगितलेल्या घाटावर येऊन मृताचा चेहरा बघतात. कुटुंबीयांना अंत्यसंस्काराचीही मुभा नाही. अंत्यसंस्काराचे पवित्र कार्य कर्मचाऱ्यांकडून उरकले जाते.

अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतापासून कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना पीपीई किट्‍स दिली जाते. एका पार्थिवासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. हे चारही कर्मचारी दररोज चार ते पाच मृतांवर अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे महापालिकेकडून दररोज एका कर्मचाऱ्याला चार ते पाच पीपीई किट दिली जाते. परंतु, चार ते पाच पीपीई किटचा वापर करण्याऐवजी काही कर्मचारी एक किंवा दोन किटचा वापर करीत असल्याची बाब पुढे आली.

नुकताच शिल्लक किट्‍स घाटावर आलेल्या नातेवाइकांना प्रति किट पाचशे रुपये याप्रमाणे विक्री करीत असल्याची बाब ८ तारखेला अंबाझरी घाटावर उघडकीस आली. शहरात उपचार घेणाऱ्या जिल्ह्याबाहेरच्या एका बाधिताचा मृत्यू झाला. या मृतासोबत केवळ त्यांचा मुलगा होता. त्याला अंबाझरी घाटावर येण्यास सांगितले. मुलाला पार्थिवाचा चेहरा दाखविण्यात आला.

परंतु, त्यासाठी त्याला पीपीई किट्‍स उपलब्ध असून ते खरेदी करावे लागेल, असे सांगण्यात आले. शहराबाहेरचा असल्याने त्या शोकाकूल मुलाने पित्याचा चेहरा बघण्यासाठी कर्मचाऱ्याने सांगितलेली रक्कम दिली. कर्मचाऱ्यांनी त्याला पीपीई किट दिल्यानंतर वडिलाचा शेवटचा चेहरा बघितला. ही बाब त्याने नागपुरातील त्यांच्या संपर्कातील काही जणांना सांगितल्याने पीपीई किटची विक्री होत असल्याची बाब पुढे आली.

संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल
घाटांवर पीपीई किट्‍सची कर्मचाऱ्यांकडून विक्रीसंदर्भात अद्यापही कुणाची तक्रार आली नाही. एखाद्या मृताच्या नातेवाईकासोबत असा प्रकार घडला असेल तर त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे असा प्रकार होऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल.
- डॉ. प्रदीप दासरवार,
उपायुक्त, महानगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()