महाविद्यालय आणि शिकवणीवर्गांचे साटेलोटे, कोटींचा गोरखधंदा

Exam students
Exam students
Updated on

नागपूर : राजस्थान मधील "कोटा' येथे "जेईई' आणि "नीट' यासारख्या प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करण्यासाठी  विद्यार्थी जातात. या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांकडूनच "कोटा'मधील शिकवणी वर्गांची निवड केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी "कोटा'मधील शिकवणी वर्गाला महाविद्यालयांकडून लाखो रुपये दिले जातात. ही रक्कम महाविद्यालयांद्वारे पालकांच्या खिशातून वसुल केली जात असल्याची माहिती आहे. 

"कोटा'मधील शिकवणी वर्गात प्रवेश मिळताच, आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो, असे दिवास्वप्न पालकांना दाखवून महाविद्यालयांद्वारे वाट्टेल तेवढे पैसे वसुल केले जातात. यासाठी महाविद्यालयांद्वारे "कोटा'मधील नामवंत शिकवणी वर्गांशी संधान साधले जाते. त्यामुळे या शिकवणी वर्गाद्वारे प्रत्येक मुलाकडून अतिरिक्त 20 ते 40 हजार रुपये वसुल केले जातात. एका महाविद्यालयातून किमान वीस विद्यार्थी यासाठी तयार होत असल्याने जवळपास 4 ते 5 लाख याप्रमाणे शिकवणी वर्गांकडून दरवर्षी कोट्यवधींची कमाई केली जाते. 

दरवर्षी दोन ते तीन हजार विद्यार्थी "कोटा' येथील नामवंत क्‍लासेसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नरत असतात. यासाठी हवी ती किंमत ते मोजायला तयार असतात. यावर्षीही जवळपास अडीच हजारावर विद्यार्थी "कोटा' येथे प्रविष्ठ असल्याचे समजते. त्यात एकट्या नागपुरातून 300 हुन अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पैशाचा व्यवहार असल्याने त्या विद्यार्थ्यांचे असाईमेंट आणि प्रात्यक्षिकही "मॅनेज' करण्यात येते. केवळ शेवटी परीक्षेसाठी हे विद्यार्थी शहरात परत येत असतात. परीक्षा संपताच, विद्यार्थी सरावासाठी पुन्हा "कोटा'मध्ये शिकण्यासाठी परत जातात. मात्र, यादरम्यान महाविद्यालयांकडून त्यांची बायोमॅट्रीक हजेरीही लावण्यात येत असल्याचे समजते. मात्र, आता कोटावरुन आलेल्या विद्यार्थ्यांमुळे ही बाब उघडकीस आली असल्याने महाविद्यालयांचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. 

चौकशीत अडकणार प्राचार्य ! 
कोटा कनेक्‍शनमध्ये एकीकडे शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीनुसार शिक्षण विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केेली आहे. लवकरच याबाबत राज्यातील प्रत्येक जिल्हयातून "कोटा'मधून आलेल्या विद्यार्थ्यांची नावे मागवून घेत, या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात प्राचार्यांवर कारवाईची शक्‍यता नाकारता येत नाही. शहरातील बऱ्याच नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या प्राचार्यांवरही गदा येण्याची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.