कामठी (जि.नागपूर) : तालुक्यातील बाराशेच्या जवळ पोहोचलेली रुग्णसंख्या रोडावत चालली असून आज फक्त १५ रुग्ण आढळले. ३१ रुग्ण आज पुन्हा घरी परतले. तालुक्यात तब्बल ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून फक्त १६१ रुग्ण अॅक्टिव आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्यावर पोहोचल्याने तालुका प्रशासनासह नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे.
अधिक वाचाः व्वा रे कोरोना... आयटीआयच्या 20 हजार विद्यार्थ्यांवर आणली ही वेळ…
कामठी तालुक्यात आज १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्याची रूग्णसंख्या ११७९ झाली तर मृत्यूसंख्या ४६ झाली आहे. आज ३१ रुग्णांनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. आजपर्यंत तब्बल ९७७ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने कमी होत असून आज फक्त १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात शहरातील फक्त चार रुग्णाचा समावेश असून यात नेताजी चौक, तिलक नगर मोंढा, मोदी पडाव, शांती नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील अकरा रुग्णामध्ये बिना येथे सर्वाधिक पाच, गादा तीन व वारेगाव, रनाळा, सावळी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मागील एक महिन्यात १९ महिला व २७ पुरुष असे सतत एकामागे एक ४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील विविध भागातील २९, ग्रामीण भागातील १४ यात सर्वाधिक येरखेडा येथील सात आहेत, तर छावणी परीषद क्षेत्रातील तीघांचा मृत्यू झाला आहे. यातील तब्बल ३० व्यक्ती पन्नास वर्षांवरील आहेत.
अधिक वाचाः नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ
काटोल तालुक्यात एकूण२३६ बाधित
काटोल : शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून शनिवारी पोलिसांसह ४ ने रुग्णात भर पडली. यात आयुडीपी, पंचवटी प्रत्येकी एक व २ सावरगाव रॉड काटोल येथील असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सुधीर वाघमारे यांनी दिली. काटोल येथून१६१पॉझिटिव्ह नोंद असून यापैकी ११८ बरे झाले. ३ मृत असून उर्वरित ४० उपचार घेत आहेत. काटोल तालुक्यात ग्रामीण भागात एकूण७५ बाधित, ५६ बरे, २ मृत, १७ उपचार घेत आहेत. उपचारापैकी १५ पारडसिंगा केअर सेंटर तर २ नागपूर येथे उपचार घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे यांनी सांगितले. काटोल तालुक्यात शहर १६१ व ग्रामीण ७५, असे एकूण २३६ आतापर्यत बाधित असल्याची नोंद आहे .यात एकूण ५ मृतांचा समावेश आहे.
अधिकारी ‘निगेटिव्ह’ तर कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’
टाकळघाटः एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्यातील तब्बल१४ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पोलिस ठाण्यात भीतीचे वातावरण तयार झाले. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपानंतर सार्वत्रिक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस
रात्रंदिवस रस्त्यावर उतरले होते. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पोलिसांनी आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडले. बहुतांश पोलिसांना कोरोनाची लागणसुद्धा झाली. त्यातून कोरोनावर मात करीत भरपूर पोलिस कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. महत्वाची बाब अशी की ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव कमी होता. परंतू शिथिलता मिळाल्यानंतर ग्रामीणमध्ये कोरोनाला रोखणे कठीण होत चालले आहे. त्याचस्थितीत आपल्या सर्वांच्या सेवेत असलेले एमआयडीसी बुटीबोरी पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस ड्युटीमुळे आजाराचे प्रमाण वाटू लागल्याने वरिष्ठांच्या व पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यातील४० कर्मचाऱ्यांपैकी पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कर्मचारी अशा३०जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. त्यात पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह १६ जणांचा अहवाल नकारात्मक तर १४ जणांचा अहवाल संक्रमित आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले. संक्रमित असलेल्या १४पैकी ९ जणांना एमएलए होस्टेलवर तर ५ जणांना घरीच क्वारंन्टाईन करण्यात आले. त्यांनतर ताबडतोब संपूर्ण पोलिस ठाणे परिसरात फवारणी करण्यात आली.
पोलिस उपनिरिक्षकासह दोन होमगार्ड संक्रमित
पारशिवनीः दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. शहरात शनिवारी नागरिकांची कोरोनातपासणी करण्यात आली. शहरात एकूण नव रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लहान मुलेही
या आजाराच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. पिगळा या गावातील चार नागरिक संक्रमित आढळून आले. कांद्री गावात एक रुग्ण तपासणीत आढळून आल्याने ग्रामीण भागात आजाराने थैमान घातले आहे. शुक्रवारी पारशिवनी शहरात संक्रमित रुग्ण आढळले आले होते. मागील काही दिवसांपासून शहरी भागासहीत ग्रामीण भागातील नागरिकांना लागण होत असल्याचे मोठया प्रमाणात दिसून आले आहे. या आजाराच्या विळख्यात पोलिसही सापडले आहेत.
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.