लॉकडाउनचा खरा फायदा झाला कॉपीबहाद्दरांना, कसे ते वाचाच... 

exam
exam
Updated on

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एकीकडे नुकसान होत असताना, दहावी आणि बारावीच्या पेपरदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे चांगलेच साधले आहे. राज्यात लॉकडाउमुळे जवळपास 1200हून अधिक कॉपीबहाद्दरांच्या सुनावणी झाल्या नसून, त्या लांबण्याची शक्‍यता निर्माण आहे. 

दरवर्षी शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये बरेच गैरप्रकार होताना दिसून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली जाते. मात्र, त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात कॉपीची प्रकरणे उघडकीस आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, यावर्षी दहावी आणि बारावीच्या इंग्रजीसह विज्ञान विषयातील पेपरदरम्यान बऱ्याच प्रमाणात कॉपी झाल्याचे आढळून आलेत. यात नागपूर बोर्डात दोन प्रकरणात बोगस विद्यार्थी असल्याचे आढळून आले होते. दरवर्षी कॉपी प्रकरणांची सुनावणी घेण्यात येत असते. ही सुनावणी एप्रिल-मेदरम्यान प्रत्येक बोर्डात नेमलेल्या समितीमार्फत होत असते. यापैकी निर्दोष सुटणाऱ्यांची संख्या कमी असली, तरी जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना किमान एक ते तीन परीक्षांपासून वंचित ठेवण्याची शिक्षा होत असते. 

बाराशेहून अधिक कॉपी प्रकरणांची सुनावणी रखडली 
साधारणत: पंधरा ते वीस दिवस ही समिती कार्य करते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा महिन्याभरापासून राज्यात लॉकडाउनची परिस्थिती आहे. यामुळे बोर्डाचा दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. सध्या मूल्यांकन वगळता सगळीच कार्यालये बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची सुनावणी कशी होणार, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र, यामुळे कॉपीबहाद्दरांचे चांगलेच साधले आहे. राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांत 1200 हून अधिक कॉपीची प्रकरणे आहेत. यामध्ये कोकण विभागात एकही प्रकरण नसून, मराठवाड्यात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे असल्याचे समजते.

आईच्या अंत्यदर्शनासाठी केला अडीचशे किलोमीटरचा प्रवास; मात्र, तयारी पूर्ण झाल्याने...
 

लॉकडाऊनमुळे सर्वच कामे बंद असल्याने प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहेत. यंदाही कॉपीची बरीच प्रकरणे असल्याने दहा ते पंधरा दिवसात त्याचा निपटारा होणे शक्‍य आहे. लॉकडाऊन उठल्यावर त्याबाबत बोर्डाचे निर्देश येताच, योग्य निर्णय घेण्यात येईल. 
- रविकांत देशपांडे, 
प्रभारी अध्यक्ष, 
विभागीय शिक्षण मंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.