नागपूर ः आर्किटेक एकनाथ निमगडे यांच्या कोट्यवधीच्या जमिनीवर डोळा असणाऱ्यांनी श्रीराम सेनेचा प्रमुख रणजीत सफेलकरला पाच कोटींची सुपारी दिली. परंतु रणजीतने हत्याकांड करणाऱ्या गॅंगला केवल २० लाख रुपये दिले होते. त्यामुळे जवळपास एक महिनाभर टोळीने निमगडे यांची हत्या टाळली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्कीटेक एकनाथ निमगडे यांची विमानतळाजवळ २०० कोटी रुपयांची साडेपाच एकर जमिन होती. त्या जमिनीवर अनेकांचा डोळा होता. त्याच कारणातून निमगडे यांची हत्या घडवून आणण्यासाठी एका ‘बड्या शेठ’ने श्रीराम सेनेचा अध्यक्ष रणजीत सफेलकर याला पाच कोटींची सुपारी देण्यात आली होती. त्याने राईट हॅंड शरद ऊर्फ कालू हाटे, नवाब ऊर्फ नब्बू छोटेसाब अशरफी, शाहबाज, राजा ऊर्फ पीओपी, बाबा, परवेज, फिरोज, मुश्ताक ऊर्फ मुशू छोटेसाब अशरफी आणि अफसर या कुख्यात गुंडाच्या टोळीची निवड केली. जुलै २०१६ मध्ये ॲडव्हान्स म्हणून २० लाख रुपये देण्यात आले.
फक्त २० लाख रूपये दिल्यामुळे टोळी नाराज झाली. महिनाभर टोळी फक्त दारू आणि पार्ट्या करीत होती. रणजीतने टोळीची मिटींग घेतली आणि काम कुठपर्यंत आले? अशी विचारणा केली. त्यावर टोळीने सपशेल नकार देत पैशाची मागणी केली. त्यामुळे रणजीतने लगेच एक कोटी रुपये टोळीला दिले.
टोळीने महिनाभर रेकी केल्यानंतर ६ सप्टेबरला सकाळी निमगडेंची गोळीबार करून हत्या केली. हत्याकांडानंतर कालू हाटे आणि गॅंगला ५० लाख रुपये सफेलकरने दिले. सफेलकरने स्वतः तीन कोटी तर खून करणाऱ्या टोळीला २ कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.
आझमगढमधून आणला सुपारी किलर
निमगडेंची हत्या करण्यासाठी रणजीत सफेलकर आणि कालू हाटे यांनी उत्तरप्रदेशमधील आझमगढमधील सुपारी किलर बाबा पीओपी याला नागपुरात बोलावले. बाबा, राजा आणि परवेज यांनी दुचाकीवर येऊन तिघांनीही निमगडे यांच्यावर गोळीबार केला. बाईक घेऊन तिघांनीही कामठीत पळ काढला. दुचाकीची विल्हेवाट लावली. बाबा याला नागपूर पोलिसांनी छिंदवाडा कारागृहातून एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते.
पिस्तुल जप्त
निमगडे हत्याकांड घडविण्यासाठी सफेलकरने उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातून पाच पिस्तूल विकत आणल्या होत्या. हत्याकांडाचे नियोजन तब्ब १५ जणांनी केले होते. त्यामध्ये एक महिना रेकी तर काही दिवस त्या रस्त्याचा अभ्यास करण्यात आला होता. ज्या पिस्तूलातून निमगडेंवर गोळ्या झाडल्या, त्या पिस्तुल पोलिसांनी जप्त केल्या आहेत
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.