धक्कादायक! पोहरादेवीत गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना होतं टार्गेट; गर्दी होती मॅनेज?

Crowd in Pohradevi is managed by Sanjay rathod
Crowd in Pohradevi is managed by Sanjay rathod
Updated on

नागपूर ः गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे आमदार आणि वनमंत्री संजय राठोड बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या पोहरादेवी गडावर गेले. मात्र एकटे गेले नाहीत तर हजारोंची गर्दी घेऊन गेले असे आरोप केले जात आहेत. मात्र आता या आरोपांमध्ये तथ्य आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला टार्गेट देऊन लोकांना पोहरादेवी येथे नेण्याबाबत सांगितले होते. पंचायत समितीनुसारही असेच टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून २५ ते ३० गाड्या पोहरादेवीला नेण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. 

जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचेच 

याशिवाय त्यांच्या इतर समर्थकांनी जमेल तसे आणि जमेल त्या वाहनांनी लोकांना पोहरादेवी येथे नेले. त्यामुळे तेथे एका वेळी येवढी गर्दी झाली. नाही तर कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला असताना लोकांनी स्वतःहून येवढा प्रवास करून जाणे सहज शक्य नाही. दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. तिन्ही तालुक्यांतील पंचायत समितीसुद्धा शिवसेनेच्याच ताब्यात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा राठोडांनी शक्तिप्रदर्शनासाठी उचलला असल्याचेही बोलले जात आहे. 

लोकं स्वतःहून गेले की नेण्यात आले?

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिचा ८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मानवाडी परिसरात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. विरोधी पक्ष तर त्यांच्यावर तुटूनच पडला. घटनेनंतर ते १५ दिवस गायब होते. काल बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे ते प्रगटले. एकप्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनच केले. पण येवढे हजारो लोक पोहरादेवीला स्वतःहून गेले की त्यांना नेण्यात आले, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. 

शक्तिप्रदर्शन करण्यासाठी तारीख पुढे?

संजय राठोड भूमिगत असताना पुसद येथे त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा तेथे धड १५-२० लोकही जमले नव्हते आणि त्या मोर्चाचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पोहरादेवीत असे काही होऊ नये, म्हणून आधीच खबरदारी घेण्यात आली असल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळेच पोहरादेवीच्या दर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. हे शक्तिप्रदर्शन कशासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी की सहानुभूती मिळविण्यासाठी, असेही प्रश्‍न समाजातून विचारले जात आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.