हिंगणघाटमधील पीडिता प्राध्यापिकेची झुंज अयशस्वी

Death of victim in Hinganghat
Death of victim in Hinganghat
Updated on

नागपूर : वर्ध्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी 6.55 निमिटांनी हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालायात उपचार सुरू होता. सात दिवसांपासून तिची मृत्यूची झुंज सुरू होती. मात्र, दोन दिवसांपासून प्रकृती अधिकच खालावल्याने चिंता व्यक्‍त केली जात होती. अखेर तिची झुंज अपयशी ठरली व मृत्यू झाल्याचे डॉ. राजेश अटव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील 30 वर्षीय प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. आरोपीला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. 

पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले. त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता. त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला होता. 

त्याचवेळी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि या मार्गाने जाणाऱ्या इतर युवकांनी आग विझवून येथील उपजिल्हा रुग्णांलयात दाखल केले. तरुणी गंभीर भाजली असल्याने प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत होते. तरीही येते सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. काल तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेव ल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली होती. प्रकृती गंभीर असताना सोमवारी सकाळी 6.55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. 

आरोपीला आमच्या समोर जाळा

माझा मुलीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. त्यालाला तशीही वेदना झाली पाहिती, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली. 

संसर्गामुळे ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न डॉक्‍टरांनी केला. काल रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. संसर्गामुळे रक्तपेशी, रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असे डॉक्‍टरांनी सांगितले. पीडितेचे पार्थिव पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार आहे. 

शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर

पीडितेला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर डॉक्‍टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि आठवड्याभरापासून सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली. 

जळीतकांड प्रकरण

30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवारी तीन फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत होता. हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.