हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाचा भटक्या कुत्र्याने घेतला जीव; विधवा आईवर कोसळला दुखाचा डोंगर

Death of a youth in an accident in Nagpur
Death of a youth in an accident in Nagpur
Updated on

नागपूर : अचानक बेवारस कुत्रा दुचाकीला आडवा आला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात आईला एकुलता एक असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नऊ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेसा रोडवरील अतिथी रेस्टॉरंटसमोर घडली. संदेश अशोक बावीस्कर (वय २८, रा. महाकालीनगर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा मानेवाडा येथे एका ड्रेस मटेरियलच्या दुकानात काम करीत होता. वडील नसल्याने त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण मामानेच पूर्ण केले. त्याला आई आणि एक बहीण आहे. बावीस्कर कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून तो दुकानात काम करायचा.

घटनेच्या दिवशी तो दुकानात गेला होता. परंतु, काही आवश्यक कामानिमित्त तो त्याच्या  एमएच ४९ / बीएच १०२८ क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यास निघाला. हुडकेश्वर हद्दीतील बेसा मार्गाने जात असताना अचानक एक भटका कुत्रा आडवा आला आणि दुचाकी स्लीप होऊन तो खाली पडला. घसरत जाऊन त्याचे डोके दुभाजकावर आदळले. त्याला तातडीने मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेल्मेटचे बेल्ट बांधले असते तर

घरी जात असताना संदेशने हेल्मेट आणि तोंडाला मास्क लावलेला होता. पण, हेल्मेट निकृष्ट दर्जाचे होते. शिवाय त्याचा मानेखाली बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्यानंतर तो खाली पडताच हेल्मेट दूरवर फेकले गेले आणि तिथेच घात झाला. हेल्मेट डोक्यातून बाहेर पडले आणि त्याचे डोके दुभाजकावर आदळले. जर त्याने हेल्मेटचा बेल्ट बांधलेला असता तर आज संदेश जिवंत असता...

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()