तो कुबड्यांचा आधार घेत आला अन्‌ धावू, उडी मारू लागला

Distribution of artificial limbs in Nagpur by the Chief Justice
Distribution of artificial limbs in Nagpur by the Chief Justice
Updated on

नागपूर : भला मोठा मंडप. विधी क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांगांची उपस्थिती. चोख बंदोबस्त. सरन्यायाधीशांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप होत होते. अशातच कुबड्यांचा आधार घेत आलेल्या दिव्यांगाने कृत्रिम अवयव शरीराला बसवताच क्षणात ते चालू, धावू, उडी मारू लागले हे पाहून उपस्थितही अवाक्‌ झाले. निमित्त होते राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण आणि भगवान महावीर विकलांग सहायता समितीतर्फे आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे.

उद्‌घाटन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती (प्रभार) भूषण धर्माधिकारी, नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, ओडिशाचे लोकायुक्त अजित सिंग, श्री महावीर विकलांग सहायता समितीचे संस्थापक पद्मश्री डी. आर. मेहता, मधू सारडा, माजी खासदार अजय संचेती, हर्षदा जव्हेरी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते "महावीर व्हिजन' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सावनेर येथील मूकबधिर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका दुर्गा चेडे यांच्या मदतीने हावभावातून राष्ट्रभक्ती गीताचे सादरीकरण केले. नारी रोडवरील श्री किसन मूकबधिर निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. ऐकू व बोलू शकत नसलेल्या चिमुकल्या जीवांचे सरन्यायाधीशांसह मान्यवरांनी कौतुक केले.
डी. आर मेहता म्हणाले, कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेले न्यायमूर्ती, न्यायाधीशांची उपस्थिती म्हणजे संवेदनशीलतेचे द्योतक आहे. दिव्यांग म्हणजे समाजातून प्रतिष्ठा, आत्मसन्मान हरवलेले लोक. कृत्रिम अवयवाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. या लोकांना पायावर उभे करायला आम्हाला खूप आनंद होतो. भगवान महावीर, महात्मा गांधींच्या विचारांवर हे काम सुरू आहे. संचालन शर्वरी जोशी, राधिका बजाज यांनी केले. भरत पारेख यांनी आभार मानले.

साडेतीन हजार दिव्यांगांना लाभ

7 मार्चपर्यंत आमदार निवास येथे आयोजित या शिबिरात 3 हजार 500 दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येईल. रविवारी झालेल्या उद्‌घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते डॅनी, बळीराम, इच्छा, कारूपंत, सहदेव सहारे या दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

समाजातील अनेक लोक अत्यंत वेदना सहन करीत जीवन जगतात. त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती. त्यामुळे माझ्यापेक्षा आज हे सर्व साध्य करणारे महावीर विकलांग समितीचे संस्थापक मेहता यांच्याप्रती आदर व्यक्त करायला हवा. हा क्षण भाषण देण्याचा नाही, दिव्यांगांप्रती मानवता व्यक्त करण्याचा आहे.
-शरद बोबडे, सरन्यायाधीश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.