डॉक्टर, असं वागणं बरं नव्हे

doctor.jpg
doctor.jpg
Updated on

नागपूर : एका विशिष्ट धर्माविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्या डॉक्टरला नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मिडियाचा वापर सकारात्मकतेने करावा, अशी अपेक्षा असते. निदान सर्वसामान्यांशी निगडीत असणारे शिक्षक, नेते, समाजसेवक आणि डॉक्टर यांच्यावर तर अशा माध्यमांचा योगरित्या वापर करण्याची नैतिक जबाबदारीच येते. पण, प्रत्येकजन ही जबाबदारी पार पाडतोच असे नाही. नागपूर शहरात राहणाऱ्या डॉक्टरने सार्वजनिक जीवनात आवश्यक असणाऱ्या मर्यादेचा भंग केला आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला तुरूंगाची हवा खावी लागली.  डॉ. सतीश बी. सोनार रा. समर्थनगर, अजनी असे आरोपीचे नाव आहे.

शाहबाज अब्रार सिद्दीकी रा. चौधरी ले-आऊट, अनंतनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. सोनार यांनी गेल्या ६ मे ला आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून मुस्लीम समुदायासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. या संदेशामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. सोनार हा मुस्लीम समाजासंदर्भात नियमितपणे आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमांवर टाकत असतो. हा प्रकार लक्षात येताच शाहबाज यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अजन पोलिसांनी त्यांच्या अर्जाची चौकशी केली व त्यानंतर पोलिसांनी  भादंविचे कलम २९५-अ, ५०५, २९४ आणि १८८ गुन्हा दाखल करून सोनार याला पोलिसांनी अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.