हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

The dog gave a vision of humanity
The dog gave a vision of humanity
Updated on

नागपूर : वाघ्या (मराठी भाषेत वाघ) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव श्वान होता. तो मिश्र जातीचा होता. असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. यामुळेच रायगड किल्ल्याच्या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान श्वान वाघ्याचा पुतळा देखील बसविण्यात आला. आज मला पुन्हा श्वानातील इमानदारी व माणुसकीचे दर्शन घडले. सोन्या नावाचा हा श्वान माणुसकीचे दर्शन घडवणारा दिसला तो पुढील घटनेमुळेच...

प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव सर्वांनाच आहे. असाच एक अनुभव एका डॉक्टरला आला. गेल्या दोन दिवसांपासून शरीरयष्टीने धिप्पाड असलेला एक गावठी श्वान धंतोलीच्या रुग्णालयात सारख्या चकरा मारत होता. तो श्वान कुणाला डसेल या भीतीपोटी रुग्णालयातील कर्मचारी सारखे हुसकावून लावत होते. मात्र, तो श्वान व्हरांड्यात वारंवार येत होता. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हा श्वान कुणाचा आहे हे कळायला मार्ग नव्हता.

दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा श्वान रुग्णालयात चौकटीतून आत डोकावून पाहत होता. डॉक्टरच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी श्वानाला हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही रुग्णालयातून बाहेर जायला तयार नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळानी बघितले असता श्वान व्हरांड्यात नजर पाडून बसलेला होता. काही वेळांनी तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला. आत येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, श्वानाच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने एक डॉक्टर विचलित झाला. त्याने श्वानाजवळ येत डोक्यावर थोपटल्यासारखे केले. यावेळी श्वान निमुटपणे मान खाली घालून उभा राहिला. आता श्वानाला आत येण्यापासून कुणीही रोखायचे नाही असे डॉक्टरने सर्वांना सामजावून सांगितले. नेहमीप्रमाणे काही वेळांनी तो श्वान ग्लास डोअर ढकलून आत शिरता झाला. कशाचा तरी वास घेत तो एक नंबरच्या खोलीत हळूच शिरला.

यानंतर रूममधील रुग्णाच्या डोक्याजवळ जाऊन श्वानाने कुकू करायला सुरुवात केली. रुग्णाने श्वानाच्या डोक्यावर कुरवाळले व थोडेसे थोपटले. मग हा श्वान हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला. सर्व रुग्ण त्याची ही कृती बघत होते. कुणालाही त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवून हा श्वान बसल्याने येणारे जाणारे त्याच्याकडे आता कुतूहलाने बघू लागले होते.

श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शन

माणसातील माणुसकी घटत चालली आहे. प्रेमाचे झरे आटत चालले आहेत. अशात एका श्वानाने आपल्या मालकाच्या आजारपणात दवाखान्यात येणे, मालकाच्या बेडपर्यंत जाणे म्हणजे श्वानातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शनच म्हणावे लागेल. आपल्या मालकाच्या प्रेमापोटी हा श्वान काही दिवसांपासून रुग्णालयात चकरा मारत होता.

मालक न दिसल्याने झाला व्याकुळ

दोन दिवस झाले मी घरी गेलो नाही. मी घरी दिसत नसल्याचे पाहून श्वान घाबरला होता. काहीही खात देखील नव्हता. घरातील लोक कोठे जातात यावर तो लक्ष ठेवून होता. रुग्णालयापर्यंतचा मार्ग त्याने हुडकून काढला. मात्र, त्याला सर्व जण हुसकावून लावत असल्याने रुग्णालयाच्या बाहेरच दोन दिवसांपासून घुटमळत राहिला होता. घरी देखील गेला नव्हता, असे त्याच्या मालकाने सांगितले.

(सोर्स - सोशल मीडिया)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.