आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध

dr jain from saoner found new techniques for Jaw operation
dr jain from saoner found new techniques for Jaw operation
Updated on

सावनेर (नागपूर): सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दुखापत झालेल्या व्यक्तीला वेदना कमी व लवकर बरे होण्याची इच्छा असते. अशावेळी शस्त्रक्रिया करताना नवनवे तंत्रज्ञान उपयोगी पडते. मेंदूनंतर जबड्याची शस्त्रक्रिया ही कठीण मानले जाते. या शस्त्रक्रियेमुळे चेहरा विद्रुप होतो. परंतु, आता जबडा फॅक्चरचा उपचार सोपा व  रुग्णांना दिलासा दिला देणारा झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. सावनेर येथील डॉ. अनुज जैन यांनी ही किमया साधली आहे.

डॉ. अनुज येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन यांचे चिरंजीव आहेत. सध्याची पिढी आपले ध्येय गाठण्यासाठी शहराच्या दिशेने धाव घेतात. ध्येय्य साध्य झाल्यानंतर त्यांना गावाचा विसर पडतो. मात्र, डॉ. अनुज यांनी आपले शिक्षण झाल्यानंतर रुग्णसेवेच्या ओढीने शहराकडे धाव न घेता आपल्या सावनेर येथील मूळ गावी लोकांच्या सहवासात रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला.  नागरिकांच्या सेवेसाठी मॅक्सकेअर डेटोकेशिलय क्लिनिक सुरू करून रुग्णसेवा सुरू केली आहे. सेवा देत असताना जबडा फॅक्चर झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे अवघड आणि महागडे असल्याने गरीब रुग्णांना ते परवडणारे नव्हते. तसेच ही शस्त्रक्रिया अवघड आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही शस्त्रक्रिया सोपी व्हावी यासाठी डॉक्टर जैन यांनी सात नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. त्यांनी हा शोध अवघ्या तीन वर्षांत लावला असून वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून त्यांच्या या संशोधनाला कॉफी राईट प्राप्त झाल्याचे डॉक्टर अनुज विनोद जैन  सांगतात.

जैन तंत्रज्ञान म्हणून ओळख -
डॉक्टर अनुज यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे कॉपीराइट झाले असून त्यांचे हे तंत्रज्ञान आता जैन तंत्रज्ञान या नावाने ओळखले जाणार आहे. सर्वसाधारणपणे जबडा बांधण्यासाठी तारांचा उपयोग केला जातो. मात्र, डॉ. जैन यांच्या तंत्राज्ञानामुळे आता तारांचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्याच्या अवघड पद्धतीपासून सुटका मिळणार आहे.  या उपचार पद्धतीचे अनेक फायदे आहेत. कमी वेळ व कुठलाही तोटा नाही. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणारा धोका कमी असतो. डॉक्टर जैन यांनी आतापर्यंत जवळपास 45 पुस्तके प्रकाशित केले असून त्या पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. डॉ.अनुज यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधून सावनेर शहराचा मान वाढविल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

एमडीएस मध्ये मिळविले सुवर्णपदक -
2020 मध्ये डॉ. अनुज यांना आयएडीएसच्या वतीने ओरल व मॅक्सीसलोफेशियल सर्जरीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. एमडीएसमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी सेवा दिली आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय बोर्ड फेलोशिपमधून इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लाटिलांजीची फेलोशिप त्यांना प्राप्त  झाली होती. 2019 मध्ये चीन दौर्‍यात एओसीएमएफ मार्फत देण्यात आलेल्या फेलोशिपसाठी पेकिंग विद्यापीठात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.