उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद; चारशे उद्योगांना थेट फटका, तर दोन हजार लहानमोठ्या उद्योगांवरही परिणाम

effect on industry due to supply of oxygen is stop in nagpur
effect on industry due to supply of oxygen is stop in nagpur
Updated on

नागपूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे ते चारशे उद्योगांना त्याचा थेट फटका बसणार आहे. लहानमोठ्या एकूण दोन हजारावर उद्योगांवर त्याचा कमी-जास्त परिणाम होणार आहे. 

ऑक्सिजनची सर्वाधिक आवश्यकता फॅब्रिकेशन इंडस्ट्रीजमध्ये भासते. धातू कापण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागते. अनेक कास्टिंग कंपन्यांमध्ये मोठ्या भट्ट्या असतात, त्या धगधगत्या ठेवण्यासाठीही ऑक्सिजन लागतो. आता लेझर कटिंगद्वारे स्टिलसह विविध धातूंची उत्पादने कापण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असते. जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर येथे पाच ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आहेत. यांच्यामार्फत या सर्वच उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यात प्रामुख्याने आता अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता ऑक्सिजनची गरज वाढणार आहे. त्यामुळे आता १०० टक्के वैद्यकीय उपयोगासाठीचा ऑक्सिजन तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

वैद्यकीय कारणाला प्राथमिकता 
नागपूर जिल्ह्यातील मौदा, बुटीबोरी, हिंगणा आणि कळमेश्वर येथे ऑक्सिजनचा वापर करणारे अनेक उद्योग आहे. आता या उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद होणार असल्याने येथील उत्पादन पूर्णपणे थांबणार आहे. लहानमोठे धरून सुमारे दोन हजार उद्योगांवर याचा परिणाम होणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. मात्र, वैद्यकीय कारणाला प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे ऑक्सिजन पुरवठादारांसह इतर उद्योजकांचे मत आहे. 

दिवसाला ६००० सिलिंडरची मागणी 
एका ऑक्सिजन उत्पादकाने सांगितले की, दिवसाला साधारणपणे ६००० सिलिंडर्सची मागणी असते. एका सिलिंडरमध्ये सात क्युबिक मीटर ऑक्सिजन भरलेला असतो. ऑक्सिजन पोहच स्वरूपात दिला जात असल्यामुळे किती अंतरावर तो पोहचवायचा आहे, त्यानुसार त्याचे दर ठरतात. एका क्युबिक मीटर गॅसची किंमत कंपनीनुसार २५ ते ३० रुपयांपर्यंत असते. याआधी उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ८०:२० प्रमाण होते. त्यानुसार कंपन्या त्यांच्या पातळीवर दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना पुरवठा करीत होत्या. मात्र, आता उद्योगांचा पुरवठा पूर्णपणे बंदच झाला आहे. 

वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन ही सध्या प्राथमिकता आहे. आमच्याकडे दररोज ५०० ऑक्सिजनचे सिलिंडर तयार होतात. त्यापेक्षा अधिकची मागणी, परंतु, उत्पादन करणे अशक्य आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन सिलिंडरची मागणी कमतरता जाणवत आहे. 
-शेखर गोडघाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमोहऑक्स इंडस्ट्रिअल गॅस प्रायव्हेट लिमिटेड 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()