Fastag Update : फास्टॅग असूनही भरावा लागला दुप्पट टोल, वाचा काय आहे कारण; टोल नाक्याबाहेर थाटली दुकाने

fastag implementation starts on toll plaza in nagpur
fastag implementation starts on toll plaza in nagpur
Updated on

नागपूर : आजपासून गाड्यांना फास्टॅग लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, अनेकांच्या गाड्यांना फास्टॅग नसल्यामुळे दुप्पट टोल आकारण्यात आला आहे. काहींनी गाड्यांना फास्टॅग  लावले आहे. मात्र, रिचार्ज केला नसल्याने त्यांनाही दुप्पट टोल भरावा लागत आहे. तसेच त्यांची काळ्या यादीत नोंद केली जात आहे. टोल भरण्यासाठी नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

कर्मचारी वाहनचालकांना दुप्पट टोलची मागणी करत आहेत. मात्र, आमच्या मालकांनी गाड्यांना फास्टॅग लावले नाही. तसेच आमच्याकडे तितके पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही टोल कुठून भरायचा? असा सवाल करत वाहन चालक हुज्जत घालताना दिसत आहेत. 

फास्टॅग लावायचा आहे, हे आम्हाला माहिती होते. मात्र, त्याची मुदत संपली. त्यामुळे फास्ट टॅग लावला नाही. आता आम्हाला दुप्पट टोल भरावा लागत आहे. 
- मुकेश रॉय, वाहनचालक

'फास्टॅग 'ची थाटली दुकाने -
अनेक वाहनांना फास्टॅग  नाही. त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारण्यात येत आहे. या टोलपासून वाचविण्यासाठी टोल नाक्यापासून काही अंतरावर फास्टॅग  दुकाने थाटण्यात आली आहेत. फास्टॅग  लावा आणि दुप्पट टोल देण्यापासून स्वतःची सुटका करा, असे सांगितले जात आहे.

फास्टॅग  म्हणजे काय आहे?
टोल नाक्यावर रोख व्यवहार करताना फार गर्दी होत असते. तसेच अनेकदा रांगा देखील लागतात. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने फास्टॅगचा नियम आणला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर काम करते.  रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होत आहे. तसेच ज्या गाड्यांना फास्ट टॅग लावण्यात आले आहे, त्या गाड्यांना टोलनाक्यावर थांबावे लागत नाही. टोलची रक्कम फास्ट टॅगसोबत लिंक असलेल्या संबंधित व्यक्तीच्या खात्यातून कापली जाते.

फास्टॅग  कुठे मिळेल? -
फास्ट टॅग कुठे घ्यायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. बँक, भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्ट टॅग विक्री केली जाते. यासोबतच आरटीओ कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र, काही निवडक पेट्रोल पंपावरही फास्ट टॅग उपलब्ध आहेत. कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.  नागरिकांना १५ फेब्रुवारीपर्यंत फास्ट टॅग लावण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, आता फास्ट टॅगची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.