नागपूर : विकृत मानसिकतेच्या पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद साकीब अब्दुल रब साकी अब्दुल रब पटेल (वय २५, रा. खापरखेडा), असे आरोपीचे नाव आहे.
मुरस्सा मोहम्मद पैकर मोहम्मद साकीब अब्दुल रब पटेल (वय २५), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. २० नोव्हेंबर २०१६ ला तिचा विवाह साकीबशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी आरोपीने तिला मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले. विकृत मानसिकतेमुळे तो पत्नीला त्रास देत होता. तिने आपल्या वडिलांना माहिती दिली होती. त्याच्या त्रासामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये दोन ते तीन वेळा बैठका होऊन तडजोड झाली होती. त्यानंतर त्याचा त्रास सुरू असल्याने तिने कळंब, यवतमाळ येथील साई कौटुंबीक मार्गदर्शन व मदत केंद्रात तक्रार केली होती. त्या ठिकाणी दोघांचेही समुपदेशन करण्यात आले व १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर तडजोडपत्र लिहून घेतले. तेव्हापासून पुन्हा मुरस्सा पतीसोबत राहू लागली. त्याच्याकडून त्रास सुरूच असल्याने तिने गेल्या १ फेब्रुवारीला कोराडी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचे वडील वसीमुद्दीन बाबर शरीफुद्दीन काजी (वय ५५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.