त्या पाच भावंडांना अखेर मिळाला मायेचा आधार

Five orphan children got shelter
Five orphan children got shelter
Updated on

नागपूर : अंबाडीजवळील गोपाळ समाजाच्या वस्तीत बेवारस स्थितीत राहणाऱ्या एका परिवारातील पाचही भावंडांना आता मायेचा आधार मिळाला आहे. एका सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या मुलांना कामठीच्या बालसदनमध्ये आणण्यात आले असून, प्रशासनाने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.  दैनिक 'सकाळ' ने या मुलांच्या अवस्थेबद्दलचे वृत्त शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले होते, हे उल्लेखनीय.

वडोदा-कुही मार्गावर अंबाडीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या आठ-दहा झोपड्यांच्या या छोट्याशा वस्तीत ही मुले राहात होती. या पाच भावंडांचे वडील मरण पावल्यानंतर आईसुद्धा दोन-तीन दिवसांपूर्वी कुणालाही न सांगता घर सोडून गेली होती. त्यामुळे ही भावंड रस्त्यावर आली होती. या वस्तीतील मंडळी दोरीवरचे खेळ करून आपले पोट भरतात. मात्र कोरोनामुळे 'लॉकडाऊन' झाल्यानंतर खेळ बंद झाले.

परिणामतः त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. वस्तीतील लहान मुले व महिला उपाशी असल्याचे समजल्यावर काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी येथील लोकांना अन्नधान्य, किराणा व इतर आवश्यक वस्तू देऊन तात्पुरती मदत केली. वस्तीतील एका परिवारातील पाच मुले बेवारस स्थितीत जगत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यासंदर्भात प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर अधिकारी वस्तीत दाखल झाले. त्यानंतर या पाचही मुलांना कामठी येथील बालसदनमध्ये आणण्यात आले. येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पाचही भावंड आता सुरक्षित आहेत. प्रशासनाने त्यांच्या राहण्या -खाण्याची तसेच शिक्षणाची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.