मंत्री पुत्राच्या लग्नात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची भेट; युवक कॉंग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

Gift of petrol and diesel gas cylinder at the wedding of the ministers son
Gift of petrol and diesel gas cylinder at the wedding of the ministers son
Updated on

नागपूर : नातेवाइकांपैकी अत्यंत जवळच्या असलेल्यांना कोणती महागडी भेटवस्तू द्यायची याबाबत मनात विचार येत असतो. केंद्र सरकारकडून देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. वाढीव दर सर्वसामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर जात आहे. त्याची सर्वसामान्यांना झळ बसते आहे. यातूनच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुत्राच्या लग्नात चक्क पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची भेट देऊन केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. लवकरच पेट्रोल डिझेलचे दर शंभरच्या वर पोहोचणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरही महाग झाला आहे. एकेकाळी ‘अच्छे दिन' याबाबत बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत. हाच धागा पकडून युवक कॉंग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

तुमसर येथे पार पडलेल्या पालकमंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांच्या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सिंग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची भेट दिली. दरवाढीची झळ थेट घराच्या अर्थसंकल्पाला बसत असल्यानेच युवक कॉंग्रेसने लग्नात वधू-वरांना अशा प्रकारची भेट देत, केद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी प्रदेश सचिव आसिफ शेख, आशाद खान, नागपूर शहर उपाध्यक्ष धीरज पांडे, भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राकेश कारमोरे, सरचिटणीस शैलेश पडोळे, सतीश पाली, मुकुंद साखरकर, भूषण टेंभुर्णे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.