नागपूर : लग्नाचे आमिष देऊन व्यावसायिकेच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. यानंतर तिची ३३ लाख २५ हजारांनी फसवणूक केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंकज कृपाचंद पटियास (वय ३८, रा. धानोरा तिडोरागड, उत्तराखंड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची २०१८ मध्ये पंकजसोबत हॉटेल हरदेवमध्ये ओळख झाली. तो विमानतळाजवळील हॉटेल प्राईडमध्ये काम करतो. सुरुवातीला मित्र म्हणून झालेली ओळख काही दिवसांत प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. त्यानंतर दोघांचे प्रदीर्घ बोलणे सुरू झाले.
पंकजने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पंकज दिसायला सुंदर आणि हॉटेलमध्ये चांगल्या पगारावर असल्यामुळे तिने लग्नाला होकार दिला. दोघांचे हॉटेलमध्ये भेटणे, जेवणे, पार्ट्या करणे सुरू झाले. त्यातच पंकजने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पंकज लग्न करणार असल्यामुळे तिने स्वत:ला त्याच्यासमोर समर्पित केले. त्यानंतर दोघांचे वेळोवेळी हॉटेलमध्ये भेटणे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू झाले.
दरम्यान, प्रेयसी एका व्यावसायिकेची मुलगी असल्याने पंकजने फायदा घेणे सुरू केले. तिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करू लागला. तीसुद्धा त्याची मागणी पूर्ण करू लागली. एकेदिवशी पंकजने तिला स्वत:चे सर्व्हिस अपार्टमेंट उघडण्याचा विचार बोलून दाखविला. परंतु, त्यासाठी मोठ्या रकमेची गरज असल्याचे प्रेयसीजवळ व्यक्त केली. त्याने तिला मोठी आर्थिक मदत मागितली.
पंकजच्या प्रेमात फसलेल्या तरुणीने त्याला पाहिजे तितकी रक्कम आणून दिली. इतकेच नाहीतर ५.६ ग्रॅमची स्वत:ची सोन्याची साखळीही दिली. पण पंकजने कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस अपार्टमेंट उघडले नाही. उलट त्या पैशाचा स्वत:च्या फायदद्यासाठी वापर केला. जवळपास दोन वर्षे पंकजचे तिच्यासोबत प्रेमप्रकरण चालले. त्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावणे सुरू केले. तिच्या वारंवारच्या लग्नाच्या तगादद्यामुळे वैतागलेल्या पंकजने टाळणे सुरू केले.
२२ जुलै २०२० नंतर त्याने स्वत:चा मोबाईलही स्वीच ऑफ केला. पंकज कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याचे पाहून अखेर तरुणीने बलात्कार व फसवणुकीची सोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पंकज पटियास विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.