अड्याळकर कुटुंबावर शोककळा : वडिलांपाठोपाठ मुलाचेही कोरोनाने निधन

Harish Adyalkar's son also died by Kerona
Harish Adyalkar's son also died by Kerona
Updated on

नागपूर : राममनोहर लोहिया आणि महात्मा गांधी यांच्या विचाराचे चिंतक ज्येष्ठ समाजवादी नेते हरीश अड्याळकर यांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलाचेही कोरोनाने शनिवारी निधन झाले. हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले होते.

नितीन अड्याळकर कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र, ते गृहविलगीकरणात होते. शनिवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे मेडिकलमध्ये दाखल करण्यासाठी त्यांच्या आप्तांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका घरी येण्याच्या आधीच त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या आप्तांनी सांगितले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नितीन अड्याळकर अवघ्या ४२ वर्षांचे होते. ते गांधीबाग परिसरातील एका खाजगी प्रतिष्ठानात नोकरीला होते. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी आहे. वडिलांपाठोपाठ मुलाचेही निधन झाल्याने अड्याळकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एवढेच नव्हेतर कोरोनाने अड्याळकर यांचे कुटुंबीयच उद्ध्वस्थ झाले आहे.

हरीश अड्याळकर यांनी सर्व आयुष्य राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांच्या पेरणीसाठी वाहून घेतले होते. रेल्वेतून सेवानिवृत्तीनंतर त्यांना राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्राची स्थापना केली होती. रेल्वेत नोकरीला असताना कामगारांनी देशव्यापी संप पुकारला होता. या संपाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते तसेच माजी केंद्रीय रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी केले होते.

जॉर्ज फर्नांडिसचे होते खास साथी

विदर्भातील नेतृत्त्वाची धुरा हरीश अड्याळकर यांनी सांभाळली होती. पोलिसांनी लाठीमार केल्याने संप चिघळला होता. नेत्यांची धरपकड सुरू असल्याने सुमारे दीड वर्षे अड्याळकर भूमिगत होते. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस त्यांचे खास साथी झाले होते. नागपूरला आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हमखास लोहिया अध्ययन केंद्राला भेट द्यायचे आणि हरीश अड्याळकर यांना भेटायचे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.