नागपूर : नाव छोट्या काल्या उर्फ नीलेश यादव सतोतिया... वय 23 वर्षे... राहणार धम्मदीपनगर... विटाभट्टी परिसरात राहणाऱ्या परवीन नावाच्या मुलीसोबत त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते... कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्याने दोघेही फेब्रुवारी महिन्यात पळून गेले होते... परंतु, काही दिवसांनी दोघेही आपापल्या घरी परतले. त्यानंतर काही दिवसांनी मार्च महिन्यात पुन्हा दोघेही घरून निघून गेले. लॉकडाऊन सुरू असताना छोट्या बायकोला घेण्यासाठी घराबाहेर बाहेर पडला अन्...
छोट्या व परवीन दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. ते एकदा पळून गेल्यानंतर घरी परतले. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा घरून पळ काढला. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात नोंदवली. अशातच दोघांनी लग्न केले आणि थेठ पोलिस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली. पोलिसांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर दोघेही मनसर येथे राहणाऱ्या मित्राकडे गेले आणि तिथेच राहू लागले.
छोट्या मिळेल ते काम करीत होता. त्यांचा नवीन संसार सुरू होऊन निव्वळ आठ ते दहा दिवसच झाले होते. अशात आईने मुलीला फोन केला. मामाची प्रकृती खालावली असून बघण्यासाठी येण्याची गळ घातली. आईच्या शब्दांवर विश्वास ठेवत ती घरी गेली अन् परतलीच नाही. यामुळे छोट्या चिंतेत होता. पत्नीला घेण्यासाठी तो वारंवार तिच्या माहेरी चकरा मारत होता. प्रारंभी कुटुंबीय काहीतरी कारण सांगून त्याला परत पाठवून देत होते. नंतरच्या काळात धमकीची भाषा सुरू झाली.
शुक्रवारी सायंकाळी छोट्या पुन्हा पत्नीच्या माहेरी गेला. परतत असताना नातेवाईकही त्याच्या मागावर होते. संचारबंदीमुळे रस्ते सुनसान होते. एका निर्मनुष्य ठिकाणी नातेवाइकांनी छोट्याला गाठले. शस्त्राचे वार करीत त्याची हत्या केली. घटनेबाबत माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. एक-एक सूत जुळवीत पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले आणि चौघांना ताब्यात घेतले.
देश लॉकडाउन सुरू असतानाच प्रेमविवाह करणाऱ्या युवकाची युवतीच्या कुटुंबीयांकडून हत्या करण्यात आली. शुक्रवारी दुपारी यशोधरानगर हद्दीतील विटाभट्टी चौकाजवळ ही थरारक घटना घडली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.