नागपूर : पत्नीशी वाद झाल्यानंतर घर सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अजनीत उघडकीस आली. शुभम संतोष जुनघरे (रा. कुंजीलालपेठ, आंबेडकरनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा रुग्णालयात हाऊस किपिंगचे काम करीत होता. दरम्यान, त्याची ओळख रुग्णालयात काम करणाऱ्या सोनूशी झाली. दोघांचे सूत जुळले. त्यांनी लग्नकरण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनी लग्न केले. दोघेही कुंजीलापेठमध्ये राहायला लागले. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत होता.
तीन दिवसांपूर्वी शुभमसोबत भांडण झाल्यानंतर ती घर सोडून निघून गेली. त्यामुळे तिच्या विरहात तो दारू प्यायला लागला. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याची आई जेवनाचा डबा घेऊन घरी आली असता शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
दिलीप विश्राम राऊत (३२, रा. खैरबोडी टोला, तिरोडा, जि. गोंदिया) रा मजुरी करीत होता. तो बुधवारी मॉं उमिया औद्योगिक वसाहतीत ठेकेदाराकडे कामासाठी आला होता. गुरुवारी सकाळी पारडी पोलिसांना कापसी पुलाजवळील एचपी पेट्रोल पंजवळील झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. दिलीपच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या जखमा होत्या. दिलीपच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरून ओळख पटली. पीआय गांगुर्डे यांनी दिलीपच्या भावाचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणी अनोळखी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सिताबर्डीतील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कजवळील शिवगौरव अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या स्पा व सलून मसाज पार्लरमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी चार तरुणींची सुटका करून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डीतील भगवाघर ले-आऊमध्ये अंजू नावाची दलाल आणि रजत ठाकूर नावाच साथिदार हे सेक्स रॅकेट चालवत होती. तिने चार तरुणींना पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. एसएसबीच्या पथकाने पंटर पाठवून कारवाई करीत सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.