नागपूर : मागील तीन दिवसांपासून उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज साठपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तर नवीन वस्ती कोरोनाच्या विळख्यात येत आहे. मध्य नागपुरातील नाईक तलाव-बांगलादेश या वस्तीत कोरोनाचा ब्लास्ट सुरू असतानाच शनिवारी रात्री उशिरा 40 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा 19 वर पोहचला. तर शहरात आणखी 28 बाधितांची भर पडल्याने नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 1298 वर गेला. सद्या मेडिकल, एम्स आणि मेयोत 384 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, यातील 4 जण मेडिकलमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 18 जून रोजी जबलपूर येथील 40 वर्षीय व्यक्तीला मिडास हॉस्पिटलमधून हलवण्यात आले. खासगीतून हलवण्यात आल्याने त्याच दिवशी कोविड चाचणी करण्यात आली. हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून आला. विशेष असे की, या व्यक्तीला मधुमेह होता. सर्दी, ताप व इतरही कोरोनासदृश्य लक्षणे होती.
कोरोनासह निदानात त्याला न्यूमोनिया असल्याचेही स्पष्ट झाले होते. श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. अखेर डॉक्टरांनी शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे नागपूर शहरात 19 व्या मृत्यूची नोंद झाली.
रविवारी शहरात आढळलेले 28 रुग्ण रामदासपेठ, मेंहदीबागेसह खरबी, त्रिमूर्तीनगर या वस्त्यांमधील आहेत. येथील सर्व बाधित हे पाचपावली विलगीकरणात होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ विलगीकरणाची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने विलगीकरणातूनच बाधितांचा आकडा वाढत आहे.
यामुळे सामुदायिक प्रार्दुभाव होत नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. विशेष असे की, नाईक तलाव बांगलादेश येथील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात या वस्तीमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. नाईक तलावपाठोपाठ मोमीनपुरा परिसरातही आतापर्यंत 256 कोरोनाबाधितांची नोंद झाली.
चार दिवसांमध्ये 200
शहरात मागील चार तासांमध्ये 200 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 17 जून ते 21 या चार दिवसांच्या कालावधीत मेयो, मेडिकल, एम्स, नीरी आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार चार दिवसात 200 रुग्णांची नोंद झाली. ही नोंद राज्याच्या तुलनेत अल्प असली तर नागपुरात मात्रा कोरोनाचा चढता आलेख कायम सुरू आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 1298 वर पोहचली आहे.
एम्स,मेडिकल मेयोत 384 बाधितांवर उपचार
शहरात मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये सुमारे 384 बाधित दाखल आहेत. या बाधितांतावर योग्यरित्या उपचार सुरू असून यातील 80टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याचे दिसून आले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 167 जणांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. तर एम्समध्ये 49 जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांवर मेयोत दाखल आहेत.
उपराजधानीत अतिशय जलदगतीने कोरोनाबाधित बरे होत आहेत. यामुळे प्रशासनाने रुग्णसंख्या वाढली तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या बघता दिलासा असल्याची भावना व्यक्तेली. विशेष असे की, एक वर्षाच्या चिमुकल्यापासून तर 70 वर्षांच्या वृद्धांनी कोरोनाला हरवले आहे. एम्समधून 5 तर मेयोतून 19 तर 14 जणांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली आहे. या रुग्णांनी आगामी 14 दिवस घराबाहेर पडू नका, कोरोनाला घाबरू नका, असा सल्ला मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिला आहे.
शहरातील हे आहेत हॉटस्पॉट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.