कारवाई होऊनही 'जनाहार'मध्ये सुधारणा नाहीच, आता तर चक्क बनवले गोडावून; गरीब प्रवाशांनी खायचे कुठे?

janahar scheme of IRCTC closed on nagpur railway station
janahar scheme of IRCTC closed on nagpur railway station
Updated on

नागपूर : गरीब प्रवाशांना पोट भरण्यासाठी रेल्वेने 'जनाहार'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण, नागपूर स्थानकावरील जनाहार तब्बल १७ महिन्यांपासून बंद पडले आहे. अलिकडे तर या जागेचा पाण्याच्या बाटल्या साठविण्यासाठी गोडावून म्हणून वापर केला जात आहे.

गरीब आणि सामान्य प्रवाशांना अत्यंत वाजवी दरात गुणवत्तापूर्ण नाश्ता आणि भोजन मिळावे अशी व्यवस्था भारतीय रेल्वेने जनाहार अंतर्गत केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरत होती. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावरील जनाहारचे पूर्वीपासूनच आगळे वेगळे महत्त्व राहिले आहे. स्वस्त नाश्त्यासोबत केवळ पंधरा रुपयांत पुरी-भाजीचे संपूर्ण जेवण प्रवाशांना मिळत होते. ही जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपविण्यात आल्यानंतर खाद्य पदार्थांची गुणवत्ता आणि शुल्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री होत असल्याने वाणिज्य विभागाने कारवाई सुद्धा केली आहे. शिवाय गरीब प्रवाशांकडून मोठी मागणी असूनही जेवण उपलब्ध करून दिले जात नसल्याच्याही तक्रारीही पुढे आल्या. काही महिन्यांपूर्वी निकृष्ट दर्जाचे अन्न उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून दंडही करण्यात आला होता. त्यानंतर कंत्राटच संपल्याने १ जुलैपासून जनाहारला कुलूप लावण्यात आले. निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात आहे. अलीकडे तर  पाण्याच्या बाटल्या साठविण्यासाठी जनाहारच्या जागेचा उपयोग होऊ लागला आहे. यामुळे गरीब प्रवाशांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 

स्वस्त दरात भोजन कधी? - 
कोरोनाचे संकट काहीसे ओसरले असून टप्प्या टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविली जात आहे. त्यातून कामानिमित्त प्रवास करणाऱ्या मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुविधेसाठी पाकीटबंद स्वस्त जेवण उपलब्ध व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आयआरसीटीसीचे दुर्लक्ष होत असल्याने जनाहार केंद्र अद्याप सुरू झाले नाही. ते कधी सुरू होईल आणि गरीब प्रवाशांना स्वस्त दरात कधी भोजन मिळेल, या प्रतीक्षेत प्रवासी आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.