निंदनीय घटना : दहा हजारांच्या कर्जासाठी सावकाराने महिलेवर केला बलात्कार

Lender's atrocities on the debtor woman
Lender's atrocities on the debtor woman
Updated on

नागपूर : आर्थिक अडचणीमुळे महिलेला पैशांची नितांत गरज होती. तिने पैशांसाठी जवळच्या लोकांना विचारणा केली. मात्र, तिची पैशांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे तिला सावकाराच्या दारात जावे लागले. लॉकडाऊनमुळे तिला पैशांची परतफेड करता आली नाही. सावकाराने पैशासाठी तगादा लावत तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. ‘पैसे नसेल तर तुझ्याकडे जे असेल ते प्रेमाने दे... मी खूश झालो की व्याज माफ करेल’ अशी भाषा वापरायचा. यातूनच त्याने मिहलेवर बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय महिला अंजली (बदललेले नाव) ही शेतमजूर असून पती व मुलीसह राहते. तिला पैशांची गरज होती. सावकार नरेश चेतराम चोकसे (वय ६०, रा. मोदी पडाव, कामठी) हा व्याजाने पैसे देत असल्याची माहिती तिला मिळाली. तिने नरेश याच्याकडून १० हजार रुपये व्याजाने घेतले. त्या पैशातून अंजलीने आपली अडचण सोडवली.

मात्र, लॉकडाऊनमुळे सहा महिने हाताला काम नसल्यामुळे पती-पत्नी बेरोजगार होते. कर्ज फेडण्यासाठी ती मजुरी करायला लागली. दरम्यान, तिच्यावर सावकार नरेश चोकशे याची नजर गेली. त्याने पैशासाठी तगादा लावत तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. २ ऑक्टोबर नरेश चोकसे अंजलीच्या घरी आला. शेतीवर मजूर पाहिजे असल्याचे सांगून तिला शेतात घेऊन गेला.

मात्र, शेतात काम नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने घरी सोडून मागितले. त्याने तिच्याशी अश्‍लील भाषेत संवाद साधून थेट शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच तिच्याशी अश्‍लील चाळे केले. मात्र, तिने प्रतिकार केल्यामुळे इभ्रत वाचली. नरेश हा ३ ऑक्टोबरला पुन्हा घरी आला.

त्याने घरात दुसरे कोणीच नाही ही संधी साधून अंजलीला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास शारीरिक सुखाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. नरेशने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला त्रास होईल, अशी धमकी दिली.

द्विधा मनःस्थितीत

सदर महिला घाबरून गेली व पतीला त्रास होईल त्यामुळे तक्रार द्यावी की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत होती. मात्र, धाडस करून तिने झालेल्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी रावणदहनाच्या पूर्वसंध्येला पोलिस स्टेशन जुनी कामठी येथे धाव घेतली. जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नरेशला अटक केली. त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळाली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()