क्या बात है! अधिकारी आणि बाबू आता दिसणार आणखी ‘स्मार्ट'; ड्रेस कोडमध्ये आता जीन्सला मुभा

Maharashtra government now allows jeans and shirt in government office employees
Maharashtra government now allows jeans and shirt in government office employees
Updated on

नागपूर ः शासकीय कार्यालयांसह महापालिकांमध्ये कार्यरत अधिकारी, बाबू, कर्मचाऱ्यांना आता जीन्स घालण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच ड्रेस कोडमध्ये बदल केला असून जीन्सवरील बंदी उठवली. त्यामुळे आता शासकीय कार्यालयातील अधिकारी, बाबूंना आवडीचा निळा, आकाशी, राखडीसह विविध रंगाचे जीन्स घालता येणार आहे. जीन्स घालण्याची मुभा दिल्याने कायार्लयात नेहमीच फाईल्समध्ये अडकलेल्या अधिकारी, बाबू आणखी स्मार्ट दिसणार आहे.

सात महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये राज्य सरकारने शासकीय कार्यालयातील तसेच कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला होता. यात कार्यालयामध्ये जीन्स व टी-शर्ट या पेहरावावर बंदी घातली होती. अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. 

या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर कार्यालयांमध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी, बाबू पॅंट व शर्टमध्ये दिसून येत होते. आता तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने या ड्रेस कोडमध्ये बदल केला आहे. 

शासकीय कार्यालयातील, महापालिकांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना आता जिन्स घालता येणार आहे. ८ डिसेंबर २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकात नमुद जीन्स व टी-शर्टचा वापर करू नये, या वाक्याऐवजी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टी-शर्टचा वापर करू नये, अशी सुधारणा केली. अर्थात अजूनही टी-शर्टवर बंदी आहे. परंतु जीन्स घालण्याची परवानगी दिल्याने कर्मचाऱ्यांना, विशेषतः तरुण अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

महिला कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझरसह जीन्सही घालता येणार आहे. ऑगस्ट २०२० पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. त्यामुळे अनेकजण जीन्स, टी-शर्ट घालून कार्यालयात काम करीत होते. ड्रेस कोडच्या बंधनामुळे अनेकांची निराशा झाली होती. आता त्यांना जीन्स घालण्याची मुभा दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

असा आहे ड्रेस कोड

- सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात टी-शर्टचा वापर करू नये.
- महिला कर्मचाऱ्यांना साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, जीन्स', ट्राऊझर पँट आणि त्यावर कुर्ता किंवा शर्ट, असा पेहराव करावा.
- पुरुषांनी शर्ट, पॅंट, ट्राऊझर पॅंट, जीन्स असा पेहराव करावा.
- महिलांनी चप्पल, सॅन्डल, शूज यांचा वापर करावा तर पुरुषांनी बूट, सॅन्डलचा वापर करावा

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()