नागपूर : तृतीयपंथी उत्तम ऊर्फ बाबा सपन सेनापतीने त्याच्यावर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पोलिस कर्मचारी व सहकैद्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. न्यायालयाने कारागृह अधीक्षक व कारागृह उपमहानिरीक्षक यांना नोटीस बजावून सहा मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. उत्तम बाबाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकेनुसार, उत्तम सेनापती हा तृतीयपंथी प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. तो ५ जून २०१९ रोजी अटक झाल्यापासून मध्यवर्ती कारागृहात आहे. ही घटना ४ जून २०१९ रोजी कळमना पोलिसांच्या हद्दीत घडली होती. उत्तमसह एकूण पाच तृतीयपंथी आरोपींना पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते.
इतर आरोपींना जामीन मिळाल्यामुळे सध्या उत्तम एकटाच कारागृहात आहे. पोलिस कर्मचारी व सहकैदी रोज लैंगिक अत्याचार करतात असा गंभीर आरोप उत्तमने केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली.
वर्चस्वाच्या लढाईमुळे उत्तमबाबा सेनापती याने किन्नर चमचम गजभिये हिचा अमानुष खून केला होता. त्याप्रकरणी तो मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. उत्तमसोबत त्याचे इतर चार साथीदारही कारागृहात पुरुष बॅरिकेटमध्ये होते. कारागृहात पाचही किन्नरांचा वारंवार विनयभंग केला जात होता. त्यांनी याबाबत डिस्ट्रिक्ट जजकडे तक्रार केली होती. त्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवावा, अशी विनंती करण्यात आली होती. चिफ जुडीशियल मॅजिस्टेटने डिस्टीक्ट जज क्र. ७ ला ती तक्रार फॉरवर्ड केली होती. पण, त्यांनी याबाबत कोणताही ऑर्डर पास केला नाही. ही तक्रार जानेवारी २०२० मध्ये देण्यात आली होती. जेल व्हिजीटमध्ये चीफ ज्युडीशियल मॅजिस्टेटला ही तक्रारीची कॉपी भेटली होती.
डिसेंबर २०२०च्या शेवटच्या आठवड्यात कारागृहातील पोलिस शिपाई आणि एका आरोपीने उत्तमबाबावर सामूहिक अत्याचार केला. याबाबत उत्तमबाबाने कारागृहात तक्रार दिली होती. पण, कारागृह प्रशासनाने त्याची तक्रार स्वीकारली नाही. मग त्याने कारागृहात चार-पाच दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर त्याची तक्रार घेण्यात आली.
मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी घेऊन चला, असे त्याने वारंवार कारागृह प्रशासनाला सांगितले. पण, त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले नाही. कोरोनाकाळ असल्यामुळे कारागृहात भेटीला बंदी असली तरी कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे उत्तमबाबाने त्याच्या आईला फोन करून सर्व हकीकत सांगितली. आईने घडलेला प्रकार वकीलाला सांगितला.
तीन दिवसांअगोदर त्यांचे वकील कैलास वाघमारे यांना फोन करून उत्तमबाबाने सर्व सांगितले. त्यात काही कर्मचारी आणि कैद्यांचे नाव उत्तमने सांगितले. मग त्याच्या वकिलांनी उत्तम याच्या आईच्या वतीने हायकोर्टात पिटीशन टाकली. त्या पिटीशनबाबत मंगळवारी नोटीस बजाविण्यात आला. यात सांगण्यात आले की, एका आठवड्याच्या आतमध्ये याचिकाकर्त्याला धंतोली पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात यावे आणि त्याची तक्रार नोंदविण्यात यावी.
कारागृहात विनयभंगाच्या घटना वारंवार होत असतात. त्यामुळे दाखल करण्यात आलेल्या पिटीशनमध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळे बॅरेक असावे, अथवा त्यांना महिला बॅरेकमध्ये ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.