नागपूर ः नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाकरिता महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी करून इतिहास घडवावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी व पीपल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नितीन राऊत व मोहन मधुकरराव वासनिक, सचिव, पीपल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, कामठी रोड येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नितीन राऊत म्हणाले की, पदवीधर निवडणुकीचे महत्त्व इतर कोणत्याही निवडणुकीच्या तुलनेत वेगळे आहे.
या निवडणुकीत मतदाता हा सुशिक्षित असतो. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सक्षम व योग्य उमेदवाराला निवडून आणणे आपले कर्तव्य आहे. भाजप हे जातीच्या मुद्यांवर निवडणूक लढते. भाजपतर्फे विशिष्ट समाजाचेच उमेदवार निवडले जातात. पण या निवडणुकीत पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर अभिजित वंजारीसह, अनिस अहमद, पीपल्स वेल्फेअर सोसायटीचे सचिव मोहन मधुकरराव वासनिक, अ.भा.कांग्रेस सेवादलाचे संघटक के.के. पांडे, पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य यशवंत पाटील उपस्थित होते. सभेचे संचालन ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले व आभारप्रदर्शन अजित सिंग यांनी केले.
यावेळी संजय दुबे, हरिभाऊ किरपाने, ठाकुर जग्यासी, बंडोपंत टेंभुर्णे, रत्नाकर जयपुरकर, नगरसेवक परसराम मानवटकर, दिनेश यादव, राकेश निकोसे, सुरेश जग्यासी, सुरेश पाटील, जयंत जांभुळकर, दीपक खोबरागडे, असद खान, साहेबराव सिरसाट, सतीश पाली, विजया हजारे, गौतम अंबादे, तुषार नंदागवळी, सचिन वासनिक, निलेश खोबरागडे, रत्नदीप गणवीर, चेतन तरारे, राकेश इखार, सलीम खान, ममता सयाम, मंगेश सातपुते, महेन्द्र बोरकर, जयकुमार रामटेके, पुंडलीक मेश्राम, विनोद सोनकर, गोविद गौर, इंदु गायकवाड, रेशमा नंदागवळी, ममता रोडगे, संगीता टेंभुर्णे, किरण यादव, मोतीलाल गुप्ता, मालिनी खोबरागडे, प्रकाश नांदगावे, माणिक वंजारी, विजया शेंडे, ज्योती खोबरागडे तसेच पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.