नागपूर : पाऊस प्रत्येकाला हवा हवासा वाटतो... सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी प्रत्येकालाच पावसाची प्रतीक्षा असते... पावसात भिजन्याचा आनंद वेगळाच... बळीराजा पावसासाठी काय काय नाही करतो... धान्य पिकवण्यासाठी पावसाची नितांत गरज असते... धरणात पाणी नसल्सास नागरिकांची मोठी पंचाईत होते... मात्र, पाऊस आता दाखल झाला आहे... परंतु, पावसाशिवाय... विश्वास बसेल ना... नाही... परंतु, हे खरं आहे... वाचा सविस्तर...
दरवर्षी मॉन्सून कोकणमार्गे पूर्व विदर्भात दाखल होतो. यावेळीही मॉन्सूनने याच मार्गाने प्रवेश केला. मात्र, यावेळी अपेक्षेपेक्षा एक-दोन दिवस लवकर आगमन झाल्याने सुखद धक्काही दिला. गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये दणक्यात सलामी दिल्यानंतर शुक्रवारी नागपूर शहरातही सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र मॉन्सून दाखल झाल्याची चर्चा होती.
मात्र, हवामान खात्याने मोसमी पूर्व पाऊस असल्याचे सांगितले. तो शनिवारी दाखल होईल, असेही भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. आता नागपूरकरांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमट वातवारण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे.
विदर्भात साधारणपणे 15 जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यापूर्वी 2018 मध्ये 8 जूनला, तर 2013 मध्ये 9 जून रोजी मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने आता पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी विदर्भात मॉन्सून दाखल झाला होता. शुक्रवारी शहरात जोरदार वर्षाव करून आपण येत असल्याचे संकेत मॉन्सूनने दिले होते. प्रादेशिक हवामान विभागानेही मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले.
हवामान विभागाने शनिवारी मॉन्सूनचा पाऊस येणार असल्याचे सांगितले होते. विदर्भात पाऊस आलाही. मात्र, काही प्रमाणात. दरवर्षी मॉन्सूनचा पाऊस ज्या प्रमाणे पडतो तसा तो आला नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्याची पार निराशा झाली.
विदर्भात दशकातील मॉन्सूनचे आगमन | |
वर्ष | तारीख |
2019 | 22 जून |
2018 | 8 जून |
2017 | 16 जून |
2016 | 18 जून |
2015 | 13 जून |
2014 | 19 जून |
2013 | 9 जून |
2012 | 17 जून |
2011 | 15 जून |
2010 | 14 जून |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.