नागपूर: भरमसाठ वीजबिलासंदर्भात सर्वसामान्यांची राज्यभरात ओरड सुरू आहे. महावितरणावर ग्राहक चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी वीजबिल भरूनही त्यांना जास्तीचे बिल पाठवण्यात आले आहे. मात्र आता या अतिरिक्त बिलांचा फटका सोलर ऊर्जा वापरणाऱ्या नागरिकांनाही बसला आहे.
घरावर सौरऊर्जा प्रकल्प लावून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या नेट मीटर धारकांनाही महावितरणने अधिकचे बिल पाठविल्याच्या घटनाही एकामागून समोर येत आहेत. नेट मीटर धारकांची ही लूट असल्याचा गंभीर आरोप ग्राहक उघडपणे करू लागले आहेत.
काय आहे 'नेट मीटरिंग'
पर्यावरणपुरक शाश्वत ऊर्जा म्हणून शासनानेच "रूफ टॉप' सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला आहे. अनेक नागपूरकरांनी "रुप टॉप' सोलारची कास धरत, शासकीय प्रयत्नांना पाठबळ दिले. दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा महावितरणच्या ग्रीडमध्ये सोडली जाते. तर, रात्रीच्या वेळेस ते महावितरणच्या विजेचा उपयोग करतात. गेलेली वीज आणि वापरलेली वीज याचा लेखाजोखा ठेवण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प असणाऱ्या ग्राहकांकडे दोन मीटर लावले जातात. या प्रकाराला नेट मीटरिंग संबोधले जाते.
आता पर्यंत हिच पद्धत अवलंबिली गेली. पण, लॉकडाउन नंतरच्या बिलात सरसकट वापरलेल्याच युनीटचे भरमसाठ बिल पाठविण्यात आले. यापूर्वी "दै. सकाळ'ने बेसा मार्गावरील चिंतामणीनगरातील रहिवासी उमाकांत बोकडे यांच्यावरील अशाच प्रकारच्या अन्यायाला वाचा फोडली होती. त्यानंतर महीवितरणने आपला चूक आणि बोकडे यांच्याकडील बिल दुरुस्त केले.
आता त्रिमूर्तीनगर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ग्राहकांकडून अशाच प्रकारच्या अन्यायाची व्यथा मांडण्यात आली आहे.
आधी यायचे 200 रुपयांचे बिल आता मात्र..
जयताळा मार्गावर राहणारे विवेक जोशी यांनी अवास्तव बिलासंदर्भात तक्रार सांगीतली. चुकीच्या पद्धतीने बिल पाठविण्यात आल्याने त्यांनी संबंधित विभागात तक्ररही केली. पण, त्याची दखलही घेतली गेली नाही. या भागातील जवळपास सर्वच नेट मिटरधारक ग्राहकांसोबत असाच अन्याच करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. या ग्राहकांना पूर्वी शंभर ते 200 च्या घरात बिल यायचे. आता मात्र 15 ते 20 हजारांचे बिल पाठविण्यात आले आहे. त्यावरील आक्षेपाची साधी दखलही घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये रोष आहे. अवास्तव बिल भरायचे तरी कसे असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.