आला उन्हाळा! नागपूरसह विदर्भात उन्हाची तीव्र लाट; चंद्रपूर जगातील दुसरे 'हॉट' शहर 

Nagpur and Vidarbha Temperature is rising gradually due to summer
Nagpur and Vidarbha Temperature is rising gradually due to summer
Updated on

नागपूर ः विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यातील पहिली उष्णलाट आली असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. मंगळवारी नागपूरच्या तापमानाने ४१.९ अंशांपर्यंत उचांकी उसळी घेतली. तर चंद्रपूर भारतासह संपूर्ण जगातील दुसरे शहर 'हॉट' शहर ठरले. उन्हाची लाट आणखी दोन-तीन कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मध्य भारतात उन्हाची लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात दिसून येत आहे. मंगळवारी नागपूरच्या कमाल तापमानात अर्ध्या अंशाची वाढ होऊन पारा ४१.९ अंशांवर गेला. यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. चंद्रपूर येथे पाऱ्याने अक्षरशः कहर केला. 

येथे केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात दुसऱ्या सर्वाधिक ४३.६ अंशांची नोंद करण्यात आली. भारतात व जगात सर्वाधिक तापमानाची नोंद बारीपाडा (ओडिशा) येथे ४४.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. ब्रम्हपुरी येथे ४३ तर अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली येथेही पारा ४२ च्या पार गेला. 

७ वर्षांपूर्वी चंद्रपूरने गाठले होते ४८ डिग्रीचे शिखर

विदर्भातील तापमानाने आतापर्यंत अनेकवेळा देशात नवनवे उच्चांक नोंदविले आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २२ मे २०१३ रोजी चंद्रपूरचा पारा तब्बल ४८ डिग्रीवर गेला होता. विदर्भाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील तो सर्वात उष्ण दिवस ठरला. त्याच्या एक दिवसानंतर (२३ मे रोजी) नागपुरातही कमाल तापमानाने ४७.९ अंशांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()