Nagpur Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांचा मृत्यू; नवे ४,१०८ पॉझिटिव्ह 

आज ४ हजार १०८ नव्या बाधितांसह वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर सलग दुसऱ्या दिवशी ६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीणमधील मृत्यूसंख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे.
आज ४ हजार १०८ नव्या बाधितांसह वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर सलग दुसऱ्या दिवशी ६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीणमधील मृत्यूसंख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे.
Updated on

नागपूर : शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने विळखा घट्ट केल्याचे गेल्या २४ तासांतील बाधित व मृत्यूच्या संख्येने स्पष्ट केले. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येनेही जुना मागील आठवड्यातील उच्चांक मोडीत काढून नवा उच्चांक नोंदविला. मागील शुक्रवारी वर्षभरातील सर्वाधिक ४ हजार ९९ बाधित आढळून आले होते. आज ४ हजार १०८ नव्या बाधितांसह वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर सलग दुसऱ्या दिवशी ६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीणमधील मृत्यूसंख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे.

जिल्ह्यात आज ४ हजार १०८ नवे बाधित आढळून आले असून वर्षभरातील बाधितांची ही सर्वोच्च संख्या आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागातील १ हजार २४८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे चित्र आहे. शहरातील बाधितांची संख्या २ हजार ८५७ असून जिल्ह्याबाहेरील तिघे बाधित आढळले. बाधितांची एकूण संख्या २ लाख ३३ हजार ७७६ पर्यंत पोहोचली. 

बाधितांच्या वाढत्या संख्येने सामान्य नागरिकांची चिंता वाढवली. मात्र, काल, गुरुवारनंतर आजही पुन्हा ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात ग्रामस्थांची झोप उडविणारी मृत्यूची संख्या नोंदविण्यात आली. आज ग्रामीणमध्ये ३० मृत्यू झाले तर शहरात २७ मृत्यू झाले. प्रथमच ग्रामीणमधील मृत्यूसंख्या शहरापेक्षा अधिक आहे. बाहेरच्या तीन मृत्यूसह जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार २१८ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील ३ हजार ३१० तर ग्रामीणमधील १ हजार ४७ कोरोनाबळींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ८६१ नागरिकांनी शहरात शेवटचा श्वास घेतला. एकूणच मृत्यू व बाधितांच्या संख्येने जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याचे चित्र आहे.

सक्रीय रुग्ण ४० हजारांवर

बाधितांची संख्या विक्रम करीत असतानाच त्याच गतीने सक्रीय रुग्णांतही वाढ होत आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ४० हजार ८०७ एवढी नोंदविण्यात आली. यात शहरातील २८ हार ९९६ तर ग्रामीण भागात ११ हजार ८११ सक्रीय रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांची सोय करण्यात प्रशासनाचा चांगलाच कस लागत आहे.

तीन हजारांवर बाधित कोरोनामुक्त

जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार २१४ बाधित कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ८७ हजार ७५१ पर्यंत पोहोचली. कोरोनामुक्तांची टक्केवारी ८०.३१ असून मागील आठवड्याच्या तुलनेत यात किंचित सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मागील शुक्रवारी, २६ मार्च रोजी कोरोनामुक्तांची टक्केवारी ८०.२३ होती.

आठवडाभरात २२ हजारांवर बाधितांची भर

गेल्या आठवडाभरात बाधितांच्या संख्येत २२ हजार ६१४ ने भर पडली. मागील आठवड्यात शुक्रवारी बाधितांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १६२ होती. आज ही संख्या २ लाख ३३ हजार ७७६ पर्यंत पोहोचली. बाधितांची संख्या अशीच वाढली तर पुढील आठवड्यापर्यंत बाधितांची एकूण संख्या अडीच लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()