लसीकरण करणाऱ्या परिचारिका प्रशिक्षित नाहीत, रुग्णालयावर ५० हजारांचा दंड

nagpur municipal corporation action on hospital due to negligence in vaccination
nagpur municipal corporation action on hospital due to negligence in vaccination
Updated on

नागपूर : कोरोना लसीकरण व नोंदणी एकाच कक्षात करण्यात येत असल्याने तसेच लसीकरण करणाऱ्या परिचारिकाही प्रशिक्षित नसल्याचे आढळून आल्याने महापालिकेने वर्धमाननगरातील रेडियन्स हॉस्पिटलवर ५० हजारांचा दंड ठोठावला. एवढेच नव्हे दररोजच्या कचऱ्यामध्ये जैविक कचरा टाकल्याचेही यावेळी उघडकीस आले. 

उपमहापौर मनीषा धावडे यांनी आज वर्धमाननगरातील रेडियन्स हॉस्पिटलची आकस्मिक पाहणी केली. यावेळी रुग्णालयात एकाच कक्षात लसीकरण व नोंदणी केली जात असल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे रुग्णांसाठी निरीक्षण कक्षाची व्यवस्थाही नसल्याचे उघडकीस आले. ज्येष्ठ नागरिकांना लस देणाऱ्या परिचारिकाही प्रशिक्षित नसल्याचे तसेच स्वच्छतेबाबतही दिरंगाई केल्याचे दिसून आले. उपमहापौर मनीषा धावडे यांनी लसीकरणाबाबत होत असलेल्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. येथे लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांना प्रमाणपत्रही दिले जात नसल्याचे उपमहापौरांच्या लक्षात आले. त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधला. एवढेच नव्हे वयोगटाबाबतही बंधने पाळण्यात येत नसल्याचे उपमहापौरांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. झोनल अधिकाऱ्यांनी उपद्रव शोध पथकाला दंडाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या. उपद्रव शोध पथकाने हॉस्पिटलवर ५० हजारांचा दंड ठोठावला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()