महापालिकेची बनवाबनवी; हजारो कोरोनाबाधित असूनही नव्हते कंटेन्मेंट झोन, केंद्रीय पथक येताच दोन दिवसात झोन अस्तित्वात

nagpur municipal corporation create containment zone before two days visit of central team
nagpur municipal corporation create containment zone before two days visit of central team
Updated on

नागपूर : शहरात दररोज दोन ते तीन हजारांपर्यंत बाधित आढळून येत असताना कुठलाही परिसर प्रतिबंधित न करणाऱ्या महापालिकेने केंद्रीय पथक येणार असल्याने तीन दिवसात मोजक्याच भागात प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात आणले. पथकाने या प्रतिबंधित क्षेत्राची शुक्रवारी पाहणी केली. पथकाने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना बाहेर न पडू देण्याच्या सूचना महापालिकेला केल्या. परंतु, तीन दिवसांपूर्वी अचानक प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्याने बिडीपेठ, दिघोरीतील नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. 

कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक गुरुवारपासून शहरात आले आहे. या आरोग्य पथकात दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्सचे डॉ. पी. पी. जोशी यांचा समावेश आहे. या पथकाने शुक्रवारी प्रभाग ३० मधील ‍बिडीपेठ कंटेनमेंट झोन, प्रभाग २८ मध्ये सर्वश्रीनगर दिघोरी, प्रभाग २६ मधील सरजू टाऊन वाठोडा कंटेनमेंट क्षेत्राचा दौरा केला. नंदनवन दर्शन कॉलनीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्राची पाहणी केली. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली.

विशेष म्हणजे शहरात मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. परंतु, आतापर्यंत एकही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. बाधितांच्या घरावर केवळ स्टिकर चिटकविण्यात आले होते. चंद्रमणीनगरातही प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. हे क्षेत्र मंगळवारी घोषित करण्यात आल्याचे या परिसरातील एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे पथक येणार असल्याने धावाधाव करीत महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने अधिकाऱ्यांना केली. पथकासोबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नेहरुनगर झोनचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत उपस्थित होते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()