नव्या 'स्ट्रेन'मुळे नागपूरकरांची चिंता वाढली, संशयितांचे अहवाल प्रतीक्षेतच

nagpur new corona strain suspected report still not received
nagpur new corona strain suspected report still not received
Updated on

नागपूर : चीनच्या वूहानमधील कोरोना विषाणूचे जगभरात थैमान घालणे थांबले नाही. त्यातच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे जगाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अत्यंत वेगाने संक्रमित होणाऱ्या या नव्या 'स्ट्रेन'मुळे नागपुरात चिंता वाढली. विदेशातून नागपुरात आलेल्या प्रवाशांपैकी सहा प्रवाशांना नव्या विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे. 

मेडिकलमधील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या या संशयितांवर डॉक्टर बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेष असे की, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून अद्याप नमुन्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने सक्तीने मेडिकलमध्ये राहावे लागत आहे. विशेष असे की, यातील दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना सुटी हवी आहे. परंतु, मार्गदर्शक सूचना अभावी सोडता येणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आठ दिवसांपासून लंडन, आर्यलँड तसेच इतर भागातून परत आलेले ६ जण मेडिकलच्या स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल आहेत. युरोपातून परतल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे निदान करण्यात आले. यात कोरोनाबाधित आढळल्याने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची शंका व्यक्त करण्यात आली. यामुळे त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही अहवाल प्राप्त न झाल्याने येथे दाखल रुग्ण तणावात आहेत. सर्वजण डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत. इंग्लंड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीसह आणखी एका बाधिताची दुसरी चाचणी मेडिकलमध्ये केली असता, कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे कोरोना निगेटिव्ह असताना किती दिवस मेडिकलमध्ये काढायचे? असा सवाल रुग्णांच्या नातेवाइकांकडून पुढे येत आहे. 

नवीन स्ट्रेनच्या चाचणीची सोय कधी? -
सहा जणांचे नमुने नवीन कोरोना तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. कोरोना तपासणी अहवाल येणे बाकी आहे. आठवडाभरापासून मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत यांना ठेवण्यात आले आहे. मात्र, पुण्यात तपासणी होणार असल्याने मेडिकलमध्ये सक्तीने दाखल ठेवण्यात येत आहे. नव्या कोरोना स्ट्रेनच्या चाचणीची सोय नागपुरातील मेयो, मेडिकलसह एम्समध्ये करण्यात यावी, या मागणीचा सूर पुढे येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()