Weekend Lockdown : राज्य सरकारने महाराष्ट्रात राबवला नागपूरचा पॅटर्न

The Nagpur pattern was implemented by the state government Weekend Lockdown in Maharashtra
The Nagpur pattern was implemented by the state government Weekend Lockdown in Maharashtra
Updated on

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. अनेक प्रयत्न करूनही सरकार व प्रशासनाला यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकट्या नागपुरात दिवसाला ३,५०० ते ४००० रुग्ण आढळून येत आहे. तसेत ६०च्या वर बाधितांचा मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, जुना अनुभवाचा विचार करता सरकारने लॉकडाउन न लावता वीकेंड लॉकडाउन लावण्याच्या निर्णय घेतला. मात्र, हा नागपूर पॅटर्न असल्याचे दिसून येते.

मागील काही दिवसांत कोरोनाने अक्षरक्ष: थैमान घातल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगाने वाढ होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच राज्य मंत्रिमंडळाची रविवारी बैठक पार पडली. बैठकीत राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल आणि इतर दिवशी कडक निर्बंध राहतील. ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. सोमवार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून दोनदा लाकडाउन लावण्यात आला होता. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर कुठल्याही प्रकारे नियंत्रण मिळत नसल्याने १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. मात्र, याचा काहीही उपयोग न झाल्याने ३१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन वाढविण्यात आले होते. तरीही शहरात रुग्ण वाढीचीसंख्या काही कमी झालेली नाही. 

शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती. यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले होते. नागपुरातील भयावह स्थितीवर महत्त्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली. या बैठकीला १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने घेतलेले अनेक निर्णय सुरुवातीपासून नागपूर शहरात लागू आहे. नागपुरात १५ एप्रिलपर्यंत रात्रीची बंदी घालण्यात आली होती. दिवसा जमाव बंदी होती. सुरुवातीला किराणा दुकान दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती. यानंतर यात वाढ करून ४ वाजेपर्यंत करण्यात आली. सर्व सार्वजनिक स्थळे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद होती.

मास्कशिवाय फिरणाऱ्याला पाचशे रुपये आणि रस्त्यावर थुंकणाऱ्याला एक हजार रुपये दंड भरावा लागणार होता. सर्व सिनेमाघर, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री बंद, लग्नात पन्‍नासपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही, अंत्यसंस्काराला वीस पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित नाही आदी नियम लागू होते. शनिवार व रविवारी कडक लॉकडाउन लागू केला होता. आता हेच नियम सरकारने लावले आहेत. यावरून राज्य सरकारने नागपूर पॅटर्न राबवल्याचे दिसून येते.

हे राहणार सुरू

  • फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा
  • सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाही
  • शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून, कामगारांवर बंधने नाही
  • बार व हॉटेलची होम डिलिव्हरी सुरू
  • जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू
  • ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी
  • टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या ५० टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी
  • शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील
  • रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल

हे राहणार बंद

  • गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद
  • सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद
  • सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद
  • सलून, ब्यूटी पार्लर व स्पा बंद
  • शाळा व महाविद्यालय बंद

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.