नागपूर : आपल्या देशाचा, आपल्या राज्याच्या तसेच आपण जिथे राहतो त्या शहराचा प्रत्येकाला अभिमान असतो. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्था हमारा’ असे आपण म्हणत असतो हे त्याचसाठी. आपण राहत असलेले घर, परिसर चांगला आणि स्वच्छ असावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. साफसफाईची सुरुवात कधीही घरातूनच केली जाते. नंतर घराबाहेरील आणि परिसराचा विचार होतो. नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसाव असे प्रत्येकाला वाटते. मात्र, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील मोठ्या १११ शहरांमधील राहणीमान सुलभता निर्देशांक २०२० (इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) आणि महानगरपालिका कामगिरी निर्देशांकाच्या निकालाची घोषणा गुरुवारी केली. यात नागपूर शहराचा २५ वा क्रमांक लागला.
या निर्देशांकामध्ये नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांनी मोठी भरारी मारली आहे. राहणीमान सुलभता निर्देशांकात नागपूर देशभरातील २५ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. सन २०१९ मध्ये शहर राहणीमान निर्देशांकात ३१ व्या क्रमांकावर होते. आता २५ व्या क्रमांकावर आले आहे. ही बाब समाधान कारण असली तरी चांगली नाही.
महानगरपालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या सर्वेक्षणात नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादामुळे शहर १७ व्या क्रमांकावर आले आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगात नागपूर ९ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर ८ व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमाने उपरोक्त घोषणा केली. यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिकेच्या कामाचे नागरिकांद्वारे मूल्यमापन करणे आणि त्यामध्ये १७ वा क्रमांक येणे ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. नागपूर महाराष्ट्राचे मोठे शहर आहे. सर्व प्रकारची सोईसुविधा नागरिकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले, वर्ष २०१९ मध्ये शहर राहणीमान निर्देशांकात ३१ व्या क्रमांकावर होते.
आता २५ व्या क्रमांकावर आहोत. पहिल्यांदा सुरू केलेले महानगरपालिका कामगिरी निर्देशांकामध्ये ३० व्या क्रमांकावर आले आहे. नागपूरच्या नागरिकांना मनपा व स्मार्ट सिटीच्या माध्यमाने दिले जाणाऱ्या सेवेत १७ वा क्रमांक दिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
ऑनलाइन कार्यक्रमात स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर, मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणीता उमरेडकर उपस्थित होते. सेन्टर फार सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लिना बुधे, ग्रीन व्हिजल फाउंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनीसुद्धा सहभाग घेतला होता.
नागपूर शहरात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे मोठे नेते आहेत. यांनी नागपूरचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी चांगले प्रयत्न केले. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीसारखे प्रकल्प राबवून शहराला पुढे नेण्यात योगदान दिले. मात्र, शहराचा २५ वा क्रमांक त्याला साजेसा नाहीय यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
शहर पुढील वर्षी सुधारणा करेल
या क्रमांकातून प्रेरणा घेऊन आणखी मेहनत करण्याची गरज आहे. नागपूर हे देशाच्या हृदयस्थळी असलेले शहर आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी भरीव योगदान दिले आहे. शहर पुढील वर्षी आपल्या क्रमांकात आणखी सुधारणा करेल.
- दयाशंकर तिवारी, महापौर
ही शहरे आहे नागपूरच्या समोर
संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.