भयंकरच... कुटुंबीयांना घरात कोंडले, चोरी केली अन् चक्क दुकानाला लावली आग

nagpur shop
nagpur shop
Updated on

नागपूर : चोरट्याने सराफा व्यावसायिकाला कुटुंबियांसह घरात कोंडून ठेवत दुकानातून लाखोंचे दागिने लंपास केले. जाताना चक्क दुकानाला आग लावून दिली आणि सीसीटीव्हीचे डिव्हीआरही घेऊन गेला. हा एखाद्या चित्रपटातील प्रसंग नसून नागपुरात घडलेली घटना आहे. सोमवारी मध्यरात्री पूर्व नागपुरातील भरातवडा परिसर या भयंकर घटनेने हादरला.

गजानन तीनखेडे (45) यांचे भरतवाडा मार्गावरील न्यू हनुमाननगर येथे घर आहे. वरच्या भागात ते राहतात, तर खाली राजलक्ष्मी ज्वेलर्स आणि राजलक्ष्मी फॅशन गॅलरी नावाने दुकाने आहेत. दोन वेगळी दुकाने असली तरी एकत्र जोडली आहेत. लॉकडाऊनमुळे दुकान बंदच होते. सोमवारी रात्री तीनखेडे पत्नी व मुलीसह बेडरूममध्ये झोपी गेले. मध्यरात्रीनंतर चोरटा मागच्या भागातील गेटमधून आत आला. गच्चीवरील दार व्यवस्थित बंद नव्हते. तिथून आत शिरला. बेडरूमला बाहेरून कडी लावून तीनखेडे कुटुंबीयांना आत कोंडून ठेवले. दुसऱ्या खोलीतून चाव्या घेतल्या. कुलूप उघडून चोरी केली व दुकानाला आग लावून निघून गेला.

लाखोंचे दागिने लंपास
पहाटे 3 वाजताच्या सुमारास पत्नीला काहीतरी जळत असल्याचा वास आला. त्यांनी पतीला उठवले. बाहेरून दार बंद असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. अखेर खिडकीतून उडी घेऊन ते बाहेर आले. दुकान जळत असल्याचे बघून आरडा ओरड करताच शेजारी धावून आले. आग विझवत असतानाच मागून दुकान उघडे असल्याचे आणि हा चोराचाच प्रताप आल्याचे लक्षात आले.


चोरटा गहाणाचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कम घेऊन गेला. आगीमुळे दोन्ही दुकानातील फर्निचर तसेच दुकानातील कपडे जळून नुकसान झाले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()