नागपूर : कोरोनाच्या एका तपासणीच्या सायकलसाठी सुमारे 7 तासांचा कालावधी लागतो. एका दिवसात तीन सायकल तपासले जातात. मात्र, मेयोतील कोरोना विषाणूच्या बाधेचे निदान करणाऱ्या प्रयोगशाळेतील एक पीसीआर बंद पडले. यामुळे नमुने तपासणीला विलंब होत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (एम्स)मध्ये कोविड-19 चाचणीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 25 नमुने तपासण्यात आले असून दिल्ली येथील मरकज येथून नागपुरात आलेला 32 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल पुढे आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
हा युवक मध्य नागपुरातील असून हा परिसर "लॉकडाऊन' करण्यात आला आहे. अहवाल कोरोनाबाधित येताच त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले. याचबरोबर उपराजधानीतील कोरोनाबाधिताचा आकडा आता 17 वर पोहोचला आहे.
दिल्ली येथून परत आल्यानंतर वनामती येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मेयोत नमुने पाठवण्यात आले होते, परंतु येथील एक यंत्र बंद पडल्याने नमुने तपासणीला उशीर झाला. मात्र एम्समध्ये शनिवारी (ता. 4) नमुने तपासणीत हा युवक कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. दिल्लीतील निझामुद्दीनच्या मरकज येथे धार्मिक कार्यासाठी गेला होता. 14 मार्चच्या सुमारास रेल्वेने नागपुरात परत आला होता. सुरूवातीला कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसली असून साथ आजाराचे औषध घेत होता. जिल्हा प्रशासनाला मरकजहून नागपुरात परत आलेल्यांची यादी मिळताच पोलिसांच्या मदतीने विलगिकरणात' घेतले गेले.
639 व्यक्ती विलगीकरणात
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विभागात संशयित व बाधित नागरिकांची प्रत्येक स्तरावर तपासणी होत आहे. करोनाची लागन झालेल्यांपैकी शहरातील चौघे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. 4 एप्रिल सकाळपर्यंत आमदार निवास, रविभवन व वनामती येथे एकूण 639 जण विलगिकरणात आहेत. विलगिकरणात असलेल्यांत निजामुद्दीनहून आलेल्या 407 जणांचा समावेश आहे. पैकी 127 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. या सगळ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंची कीट तसेच वायफाय आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत वैद्यकीय तपासणी, भोजन, चहा-नाश्ता तसेच विविध पुस्तके, वर्तमानपत्रे आदी सुविधा दिली जात असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
कोरोनासाठी 100 खाटा
कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (एम्स)मध्ये प्रयोगशाळा तयार झाली. यासोबतच एम्समध्ये 100 खाटांचा आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला आहे. संशयित कोरोनाच्या रुग्णांची तपासणीसाठी कोरोना कॉर्नरमध्ये सुरू आहे. एम्सने 100 खाटांचे स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करून कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. एम्समध्ये मास्क, व्हेंटिलेटरसह इतरही अत्यावश्यक वस्तू तातडीने खरेदी करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.