नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर लढा देत आहे. संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच नागपुरात आणखी एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी क्वारंटाइन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उपाययोजना सुरू केल्या आहे. ग्रामीण भागात कोरोना संशयित आढळल्यास त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी जिल्ह्यात 15 ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभारले जात आहे. याची क्षमता 1,235 एवढी आहे. जिल्ह्यात सध्या कामठी आणि कन्हान या दोन ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पण, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जि. प. प्रशासनाने कोव्हिड केअर सेंटर उभारले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संशयित म्हणून कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते.
हे सुद्धा वाचा - भंडाऱ्यातील आयसोलेशन वार्डात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू
हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे दोन ठिकाणी प्रत्येकी 100 लोकांची क्षमता असलेले दोन सेंटर आहे. नागपूर ग्रामीणमध्ये दाभा चौक, वाडी रोड येथे 150 लोकांची क्षमता असलेले वसतिगृह निवडलेले आहे. कामठी तालुक्यातील कोराडी येथील डॉ. आंबेडकर गव्हर्नमेंट हॉस्पिटल, छत्तरपूर फार्म बीडगाव, मौदा येथील जनता हायस्कूल, रामटेक येथील एक कॉलेज, एक वसतिगृह असे 180 क्षमतेचे कोव्हिड सेंटर तयार करण्यात आले आहे.
पारशिवनी तालुक्यातील कांद्री, काटोलमध्ये पारडसिंगा, नरखेडमध्ये एक शाळा, सावनेरमध्ये वसतिगृह, कळमेश्वरमध्ये वसतिगृह, उमरेडमध्ये वसतिगृह, भिवापूरमध्ये वसतिगृह आणि कुहीमध्येसुद्धा वसतिगृह कोव्हिड केअर सेंटरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोरोना संशयितांना 14 दिवस ठेवून त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यात येते. त्यांच्यात जर कोरोनाचे लक्षण आढळले, तर त्यांना पुढच्या उपचारासाठी पाठविण्यात येते; अन्यथा घरी पाठविते.
त्याचबरोबर प्रशासनाने प्रत्येक ब्लॉकमध्ये समर्पित कोव्हिड हेल्थ सेंटरसुद्धा तयार करून ठेवले आहे. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. पण, दक्षता म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.